धुळे ः टुडे १ साठी, ॲंकर
--
फोटो क्रमांक ः 32404
धुळे : तंबाखू व्यसनमुक्ती यश पटकावल्याबद्दल प्रमाणपत्र व बहुमान दर्शवताना एसीपीएम दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अरुण दोडामणी आणि प्राध्यापक, अधिकारी.
--
मोहिमेत एसीपीएम दंत महाविद्यालय देशात द्वितीय
-
तंबाखूमुक्तीचा नारा : केंद्र सरकारकडून गौरव; महाराष्ट्रातील एकमेव संस्थेचे यश
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १४ : जागतिक तंबाखूमुक्त दिनानिमित्त राबविलेल्या उल्लेखनीय उपक्रमांबद्दल जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या एसीपीएम दंत महाविद्यालयाने देशात दुसरा क्रमांक पटकावला आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत आयोजित या मोहिमेत देशभरातील ३१७ दंत महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. राष्ट्रीय स्तरावर हा बहुमान मिळवणारे हे महाराष्ट्रातील एकमेव महाविद्यालय ठरले आहे.
राष्ट्रीय मौखिक आरोग्य व तंबाखू व्यसनमुक्ती संसाधन केंद्रामार्फत पंधरा दिवसांची विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात आली होती. ‘ज्ञान, विज्ञान, आरोग्य आणि सेवा’ या उद्देशाने संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वात आणि अधिष्ठाता डॉ. अरुण दोडामणी यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम पार पडला.
-
नागरिकांपर्यंत पोहोचले
या मोहिमेदरम्यान रॅली, पथनाट्य, तंबाखूची होळी, ऑनलाइन वेबिनार, दंत तपासणी शिबिरे व विद्यार्थी प्रशिक्षणाच्या माध्यमातून तब्बल ३३ हजार २६ नागरिकांपर्यंत जनजागृतीचा संदेश पोहोचवण्यात आला. शिवाय २ हजार ७२६ जणांना तंबाखूमुक्तीची शपथ देण्यात आली, तर ३ हजार ९१८ व्यक्तींची आरोग्य तपासणी व समुपदेशन करण्यात आले. तसेच, ४६१ जणांना क्षमतावृद्धी प्रशिक्षण देण्यात आले असून, शैक्षणिक परिसर तंबाखूमुक्त करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले.
-
मोहिमेच्या यशासाठी...
या मोहिमेच्या यशासाठी एसीपीएम मेडिकल कॉलेज, जिल्हा आरोग्य अधिकारी, धुळे मध्यवर्ती कारागृह आणि लाइफ फर्स्ट- नरोत्तम सखसेरिया फाउंडेशनचे सहकार्य लाभले. या घवघवीत यशाबद्दल संस्थेच्या सचिव डॉ. ममता पाटील, संगीता पाटील आदींनी सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. आरोग्यसेवा मर्यादित असलेल्या ग्रामीण व आदिवासी भागात तंबाखू व्यसनमुक्ती मोहीम अधिक व्यापक स्वरूपात राबविली पाहिजे. आरोग्यसेवेपासून वंचित राहिलेल्या शेवटच्या घटकापर्यंत जनजागृती पोहोचणे गरजेचे आहे, असे आवाहन या संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार कुणाल पाटील यांनी केले.
-
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.