नाशिक

जाधव स्कूलचा विद्यार्थी राज्यात प्रथम विद्यार्थ्यांच्या यशाचे तालुक्यातून स्वागत

CD
SNR26B23222 सिन्नर ः सकाळ एनआयईच्या चित्रकला स्पर्धेत राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल आदित्य सरवार याचा गौरव करताना संभाजी जाधव, शुभांगी जाधव, अतुल नीळकंठ. ----------------- सकाळ एनआयई चित्रकलेत यशाबद्दल आदित्यचा सत्कार ------------ सकाळ वृत्तसेवा सिन्नर, ता. २२ ः शहा येथील एस. डी. जाधव इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी आदित्य किशोर सरवार याने सकाळ माध्यम समूहाच्या न्यूजपेपर इन एज्युकेश (एनआयई) तर्फे चित्रकला स्पर्धेत यश मिळविले आहे. या स्पर्धेत आदित्यने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवत ४०० रुपये रोख पारितोषिक, तर राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवत एक हजार रुपयांचे रोख पारितोषिक पटकावले. आदित्यच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष संभाजी जाधव, उपाध्यक्षा शुभांगी जाधव, प्राचार्य अतुल निळकंठ यांच्या हस्ते त्याचा गौरव करण्यात आला. आदित्यचे पालकही उपस्थित होते. मुलाने मिळवलेल्या यशाबद्दल पालकांनी आनंद व्यक्त केला. कलाशिक्षक रोशन सताळे, पूजा पगारे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता आणि कलात्मक कौशल्य विकसित होण्यास मदत होते. सकाळ एनआयईतर्फे विविध उपक्रम राबविले जात असल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष जाधव यांनी स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी असे उपक्रम महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले. शहा येथील जाधव स्कूलमध्ये सर्वांगिण विद्यार्थी घडविण्यावर भर असल्याची माहिती त्यांनी दिली. विद्यार्थ्याच्या यशाचे टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 2nd T20: भारत न्यूझीलंडचा दुसरा टी-२० सामना कधी अन् कुठे पाहता येणार? LIVE Streaming, वेळ अन् TV चॅनेलची माहिती जाणून घ्या

Dengue Infection : डेंगीने आठ वर्षांच्या मुलीचा बळी; उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यू

Latest Marathi News Live Update : 'हा' तर शिंदेंना गोत्यात आणण्याचा डाव; गुलाबराव पाटीलांनी केली ऑडिओ क्लिपच्या SIT चौकशीची मागणी

Mumbai News : शिक्षक नियुक्तीच्या पारदर्शकतेवर न्यायालयाचा शिक्कामोर्तब; शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांचा निर्णय उच्च न्यायालयाकडून कायम

Vitamins Tips: कोणतं व्हिटॅमिन कधी घ्यावं? जाणून घ्या योग्य वेळ आणि महत्त्वाच्या गोष्टी!

SCROLL FOR NEXT