फोटो : H33302
अंबड : एमआयडीसीतील सीईटीपी केंद्राची पाहणी करताना कल्पेश लहिवाल, विनायक गोखले, समीर पटवा, सुदर्शन डोंगरे, राजेंद्र पानसरे, संजय महाजन.
….
अंबडचे सांडपाणी प्रक्रिया
केंद्र लवकरच कार्यान्वित
एमआयडीसी अधिकाऱ्यांकडून प्लांटची पाहणी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २२ : अंबड औद्योगिक वसाहतीतील प्लेटिंग उद्योगांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या सामाईक सांडपाणी प्रक्रिया केंद्राची (सीईटीपी) उभारणी अंतिम टप्प्यात असून हा प्लांट लवकरच कार्यान्वित होणार आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी)चे अधिकारी आणि अंबड इंडस्ट्रीज ॲन्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) च्या पदाधिकाऱ्यांनी या प्लांटच्या कामाची संयुक्त पाहणी केली. या वेळी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता कल्पेश लहिवाल, उपअभियंता भुसारे, कंत्राटदार कुलकर्णी, प्लेटिंग असोसिएशनचे पदाधिकारी विनायक गोखले, समीर पटवा आणि सुदर्शन डोंगरे, आयमाचे अध्यक्ष राजेंद्र पानसरे आणि सरचिटणीस संजय महाजन उपस्थित होते. ‘सीईटीपी’ प्लांटमध्ये प्रत्येकी ५० हजार लिटर रसायनयुक्त पाण्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता असलेले एकूण दहा संच आहे. त्यामुळे संपूर्ण प्लांटची एकूण प्रक्रिया क्षमता पाच लाख लिटर इतकी आहे. यापैकी दोन संचांची चाचणी सुरू करण्यात आली असून उर्वरित यंत्रणा कार्यान्वित करण्याच्यादृष्टीने पुढील काम महत्त्वाचे ठरणार आहे. प्लांट सुरू झाल्यामुळे प्लेटिंग उद्योगांमधील रसायनयुक्त सांडपाण्यावर सामूहिकरीत्या प्रक्रिया करणे शक्य होईल.
---कोट
प्लांटच्या कामातील त्रुटी तातडीने दूर करून तो पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी प्राधान्याने कार्यवाही करावी. आयमाच्या वतीने या कामाचा पाठपुरावा सुरू राहील.
-राजेंद्र पानसरे, अध्यक्ष, आयमा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.