नाशिक

येवल्यात मुक्तीभूमीवर धर्मांतर घोषणा वर्धापन दिनानिमित्त आज भरगच्च कार्यक्रम

CD
धर्मांतर घोषणा वर्धापनदिनी मुक्तीभूमीवर आज कार्यक्रम ---------------- सकाळ वृत्तसेवा येवला, ता.१२ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येवला येथे केलेल्या ऐतिहासिक धर्मांतर घोषणेच्या ९१ व्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवारी (ता. १३) मुक्तीभूमी येथे विविध धार्मिक, सामाजिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहेत. भारतीय बौद्ध महासभेतर्फे धम्म ध्वजारोहण, समता सैनिक दल संचलन, कबड्डी, धावणे, लाठीकाठी प्रात्यक्षिके आणि मुख्य धम्म मेळावा होणार आहे. सकाळी नऊला मुक्तीभूमी येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे संघ व सैनिक रॅलीने होणार आहे. सकाळी दहाला भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण होईल. त्यानंतर समता सैनिक दलाचे संचलन होणार आहे. सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत कबड्डी, धावणे आणि लाठीकाठी स्पर्धा व प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी २ ते ५ या वेळेत मुख्य धम्म मेळावा होईल. मेळाव्यात भीमराव आंबेडकर, सुजात आंबेडकर, अमन आंबेडकर मार्गदर्शन करतील. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन बौद्ध महासभेतर्फे करण्यात आले आहे. मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ हे सकाळी साडे दहाला मुक्तीभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतील. सायंकाळी शहरातील शनिपटागंण येथे भीमशक्तीतर्फे माजी समाजकल्याण मंत्री, खासदार चंद्रकांत हंडोरे यांची जाहीर अभिवादन सभा होईल. सिनेअभिनेत्री तथा महिला शाहीर सीमाताई पाटील, पार्श्वगायक जाॅली मोरे यांचा क्रांतिकारी भीमगितांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम होईल. या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पगारे यांनी केले आहे. दरम्यान बार्टी आणि स्थानिक प्रशासनाच्या समन्वयातून देशभरातून येणाऱ्या भीम अनुयायांसाठी पाणी, स्वच्छता, वैद्यकीय सुविधा, प्रकाशव्यवस्था व तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यात येत आहे. गर्दीच्या पार्श्वभूमीवर अखंडित वीजपुरवठा, वाहतूक नियंत्रण, वाहनतळ आणि स्वच्छतेवर विशेष भर देण्यात आला आहे. विविध मार्गांनी येणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था केली असून, वाहनचालकांनी निर्धारित ठिकाणीच वाहने उभी करावीत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. कार्यक्रमाचे बार्टीच्या युट्यूबवर थेट प्रक्षेपणही केले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Water Supply : ३२ समाविष्ट गावातील नागरिकांना दिलासा! महापालिकेचे नवीन धोरण; सदनिकाधारकांना पाणी देणे बिल्डरला बंधनकारक

Jammu Kashmir : पूंछमध्ये LoC जवळ मोठा स्फोट; लष्कर-ए-तोयबाचा कमांडर मोहम्मद फैजानसह चौघांचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर; ३.५१ लाख शेतकऱ्यांना दिलासा

IND A vs NZ A: न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताच्या संघात मोठा बदल; रिषभ पंत बाहेर, तर २१ वर्षांचा खेळाडू घेणार जागा

Success Story: २ खोल्यांचे घर, ४ भावंडांचे यूपीएससीत यश! कुणी आयएएस तर कुणी आयपीएस बनले

SCROLL FOR NEXT