नाशिक

दोंडाईचा केंद्रीय पथक

CD
धुळे : टुडे पान १ साठी.. अँकर -- फोटो क्रमांक : 33277 दोंडाईचा : अमरावती नदीच्या पुनरुज्जीवनासाठी झालेल्या बैठकीत मार्गदर्शन करताना पालकमंत्री जयकुमार रावल. शेजारी केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचे अधिकारी, शास्त्रज्ञ, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी. -- अमरावती नदी पुनरुज्जीवनासाठी केंद्रीय पथक दोंडाईचात दाखल -- पालकमंत्री जयकुमार रावल : केंद्रीय पथकाने घेतला नदीच्या सद्यस्थितीचा आढावा सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २२ : दोंडाईचा शहराची जीवनवाहिनी असलेल्या अमरावती नदीला पुन्हा प्रवाही करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांसह तज्ज्ञ संस्था आणि नागरिकांच्या सहभागातून व्यापक उपाययोजना हाती घेण्यात येणार आहेत. अमरावती नदी पुनरुज्जीवनासाठी केंद्रीय पथक दाखल झाले असून नदीचे पुनरुज्जीवन करताना पावसाचे पाणी अडविणे, ते जमिनीत मुरविणे, नैसर्गिक जलप्रवाह मोकळे करणे आणि वृक्षारोपणाला प्राधान्य देण्यात येईल. अमरावती नदीत पुन्हा पाणी येईपर्यंत प्रयत्न थांबणार नाहीत, असा निर्धार राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दोंडाईचा येथे व्यक्त केला. - पालकमंत्री रावल यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान आणि राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालय यांच्या संयुक्त पथकाने दोंडाईचा येथे भेट देऊन नदीच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. नदी आटण्यामागील कारणांचा शोध घेणे आणि पुनरुज्जीवनासाठी योग्य उपाययोजना सुचविणे हा या दौऱ्याचा प्रमुख उद्देश आहे. यावेळी केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालयाचे संचालक मिलिंद पानपाटील, राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाचे शास्त्रज्ञ ‘डी’ उपेंद्र व्ही. धोंडे, मृद व जलसंधारण विभागाचे उपसचिव अरुण गाळवे, नाशिक येथील महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेचे उपविभागीय अधिकारी वामन चव्हाण, नंदुरबारचे वरिष्ठ भूवैज्ञानिक सुनील शिंदे, धुळ्याचे वरिष्ठ भूवैज्ञानिक गिरीशकुमार भारे, उपविभागीय अभियंता अभय पाटीदार, कनिष्ठ अभियंता दीपक सैनी, अमोल वागुळ, तहसीलदार नितीनकुमार देवरे, दोंडाईचाचे मुख्याधिकारी देवेंद्र परदेशी, अभियंता शिवनंदन राजपूत, नंदुरबारचे कनिष्ठ भूवैज्ञानिक प्रणव धनगर, दिलीप बागले, राजेश धोलप, तालुका कृषी अधिकारी सुधीर ईशी आदी उपस्थित होते. - पाणी मुरविण्यावर भर नदी पुन्हा प्रवाही करण्यासाठी केवळ बंधारे बांधणे पुरेसे नसून पाणी जमिनीत मुरविणे आवश्यक आहे. परिसरातील पाण्याचा अचूक ताळेबंद तयार करून पुढील सहा महिन्यांत नवीन व दुरुस्तीच्या कामांचा प्राधान्यक्रम ठरविला जाईल. तसेच वाळू उपसा, गाळ आणि अतिक्रमणामुळे अडथळा आलेले मुख्य पात्रासह उपनद्या व नाले मोकळे केले जातील, असे पालकमंत्री रावल यांनी नमूद केले. लातूरच्या मांजरा नदी पुनरुज्जीवनाच्या धर्तीवर विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था व नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून १५ ते २० कोटी रुपयांच्या प्राथमिक आराखड्याचा विचार करून ईशा फाउंडेशनसारख्या संस्थांच्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले जाईल. तसेच नदीकाठी ऑक्सिजन पार्क, राजे छत्रपती उद्यानात फ्रूट पार्क आणि भविष्यात बोटिंगच्या सुविधांसह दोंडाईचा शहराला ‘बोट नगरी’ म्हणून विकसित करण्याची संकल्पना आहे. केंद्रीय पथक संपूर्ण अमरावती नदीची पाहणी करणार असल्याचे सांगण्यात आले.

Shiva Sharma Death Case : २२०० किमीचा थरार, १० दिवस पोलिसांना चकवा; नेपाळ ते नागपूर पळणाऱ्या मॉडेल श्रद्धा दुबेला अखेर बेड्या

Nitesh Karale : पदवीधर निवडणुकीपूर्वी नितेश कराळे गुरुजींना धक्का; राष्ट्रवादीतून सहा वर्षांसाठी हकालपट्टी, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : हुती बंडखोरांचा सौदीतील दम्माम विमानतळावर हल्ला; एका भारतीय नागरिकाचा मृत्यू

Pune News: ‘नशामुक्त भारत’साठी समाजाने पुढे यावे; पोलिस आयुक्त अमितेश कुमार

IND vs NZ : २२६ धावांचं लक्ष्य, शेवटच्या षटकात थरार; संजू सॅमसनच्या फटकेबाजीनंतर नमन धीरचा धमाका, न्यूझीलंडवर भारताचा दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT