Sharad Pawar News esakal
नाशिक

Sharad Pawar News : जम्‍बो कार्यकारिणीतून कार्यकर्त्यांना संधी; काँग्रेस शरद पवार गटाच्‍या नियुक्त्या जाहीर

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरद पवार गटाच्‍या जिल्‍हा कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

Sharad Pawar News : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरद पवार गटाच्‍या जिल्‍हा कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. या जम्‍बो कार्यकारिणीतून कार्यकर्त्यांना विविध जबाबदाऱ्या देताना संधी देण्यात आली आहे.

विद्यार्थी संघटनेतील जबाबदाऱ्या देताना लोकसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांची फळी उभी करण्याचा प्रयत्न केला जातो. (Appointments of Congress Sharad Pawar group announced nashik news)

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्या उपस्थितीत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. तुषार जाधव यांनी विविध पदांच्या नियुक्त्या जाहीर करीत नियुक्तिपत्रांचे वाटप केले. जिल्हाध्यक्ष आव्हाड, शहराध्यक्ष गजानन शेलार आणि प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे यांनी नवीन पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

नवीन तरुणांनी शरद पवारांनी केलेले काम समजून घ्यावे. व ते नव्या पिढीला समजावून सांगण्याची अपेक्षा व्‍यक्‍त केली. आगामी लोकसभा निवडणुकीत युवा पिढीवर महत्त्वाची जबाबदारी असून, प्रचाराची जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावर घ्यावी. जिल्हाध्यक्ष म्हणून नवीन पिढीला संधी देण्याची भूमिका पुढील निवडणुकांत घेतली जाईल, असे आश्वासन या वेळी त्यांनी दिले.

महिला जिल्हाध्यक्षा संगीता पाटील, महिला जिल्हा उपाध्यक्षा वर्षा पवार, विद्यार्थी जिल्हा निरीक्षक प्रदेश सरचिटणीस सौरभ देशमुख, प्रदेश सरचिटणीस वेदांशू पाटील, प्रदेश सरचिटणीस अमोल पाटील, विद्यार्थी शहराध्यक्ष भावनेश राऊत, विद्यार्थी लोकसभा कार्याध्यक्ष करण आरोटे आदी उपस्थित होते.

कार्यकारिणी पदाधिकारी (कंसात पद)

जय पाटील (जिल्हा सरचिटणीस), करण आरोटे (नाशिक लोकसभा कार्याध्यक्ष), अक्षय भोसले, नितीन मांडवडे, रोशन अपसुंदे (सर्व जिल्हा उपाध्यक्ष), किरण पवार (जिल्हा सरचिटणीस), आकाश आहेर (जिल्हा उपाध्यक्ष), अमोल सूर्यवंशी (जिल्हा सरचिटणीस). तालुका कार्यकारिणीत यश निकम (देवळा तालुकाध्यक्ष), अभिजित ठाकरे (चांदवड तालुकाध्यक्ष), सार्थक निखाडे (दिंडोरी तालुकाध्यक्ष)

तेजस भोर (इगतपुरी तालुकाध्यक्ष), अमित शिंदे (येवला तालुकाध्यक्ष), पीयूष सोनवणे (सटाणा तालुकाध्यक्ष), प्रफुल्ल सावले (देवळा शहराध्यक्ष), शुभम निकम (देवळा तालुका कार्याध्यक्ष), सुनील कोकरे (देवळा तालुका उपाध्यक्ष), दिगंबर सोनवणे (कळवण शहराध्यक्ष), अजित बोराडे (नांदगाव तालुकाध्यक्ष), तेजस मांडवडे (जिल्हा प्रसिद्धीप्रमुख) यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IRAN-AMERICA WAR REASON : अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला का केला? 'या' 5 कारणांमुळे सुरू झालंय भीषण युद्ध, काळीज पिळवटणारे व्हिडिओ

Karachi US Consulate Protest : कराचीतील अमेरिकन दूतावासात घुसले निर्दशक, सैनिकांच्या गोळीबारात १० जणांचा मृत्यू

US, Israel war on Iran : इस्त्रायल- इराण युद्धाचा फटका, पुण्यातून दुबईसाठी विमान सेवा २ दिवस राहणार बंद, अनेक प्रवासी अडकले

Chembur Accident: चेंबूर मजूर मृत्यू प्रकरण! विकसकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल, महापौरांचे निर्देश

Latest Marathi News Update : हिंगोली शहरात उभी असलेल्या कारने घेतला अचानक पेट

SCROLL FOR NEXT