Covid care center  esakal
नाशिक

नाशिक : चौथ्या लाटेपूर्वीच कोविड सेंटर साहित्याचा लिलाव | Corona

विक्रांत मते

नाशिक : कोरोना (Corona) चौथ्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात असताना महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने तिसऱ्या लाटेचा (Third wave) प्रभाव ओसरत असताना कोविड सेंटर (Covid Centre) बंद करण्याबरोबरच आता सेंटर्स मधील बेड, गाद्या आदी प्रकारच्या साहित्याचा लिलाव (Auction) करण्याचा निर्णय घेतला आहे.

युरोपियन देश करताहेत चौथ्या लाटेचा सामना

कोरोना तीन लाटांमध्ये शहरात दोन लाख ७२ हजार ७२३ रुग्ण आढळून आले, तर आतापर्यंत ४,१०५ नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना तिसरी लाट फारशी परिणामकारक ठरली नाही. विशेष म्हणजे बिटको रुग्णालयात चार, तर झाकिर हुसेन रुग्णालयात एक रुग्ण उपचार घेत आहे. शहरात शंभर ॲक्टिव्ह रुग्ण असून, लाट ओसरत असल्याचे संकेत मानले जात आहे. वैद्यकीय विभागाने बिटको व झाकिर हुसेन रुग्णालयांना सामान्य रुग्णालय घोषित करण्याची तयारी केली आहे. समाजकल्याण वसतिगृह बंद करण्यात आले. १४ मार्चला मीनाताई ठाकरे स्टेडिअम व ठक्कर डोम कोव्हिड सेंटर बंद केले जाणार आहे, तर मेरी कोव्हिड सेंटर इमारत हस्तांतरित केली जाणार आहे.

कोरोना चौथी लाट येण्याची शक्यता आहे. युरोपियन देश चौथ्या लाटेचा सामना करत असताना देशात चौथी लाट येणारच नाही, असे समजून प्रशासनाकडून साहित्याचा लिलाव होत असल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

SCROLL FOR NEXT