नाशिक

गळीत हंगामासाठी ‘आयान’ सज्ज

CD
खानदेश 33462 (पदमाकर टापरे पासपोर्ट) गळीत हंगामासाठी ‘आयान’ सज्ज! पुढील महिन्यात शुभारंभ : १५ हजार हेक्टर उसाची नोंदणी सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. २४ : शेतकऱ्यांशी जिव्हाळ्याचे नाते जपणाऱ्या समशेरपूर येथील आयान मल्टीट्रेड एल.एल.पी.ने यावर्षीच्या गळीत हंगामासाठी तयारी पूर्ण केली असून नोव्हेंबरमध्ये त्यास प्रारंभ होईल. कारखान्याने शेतकरी बांधवांशी नेहमीच जिव्हाळ्याचे नाते जोपासले आहे. यामुळेच कारखान्याकडे ऊस नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. या हंगामात देखील कारखाना पूर्ण क्षमतेने गाळप करून साखर उत्पादनात आघाडी घेईल, असा विश्‍वास कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक पद्माकर टापरे यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला. श्री. टापरे म्हणाले की, आयान कारखान्यावर शेतकरी बांधवांचा विश्‍वास वाढला आहे. त्यामुळेच उसाच्या क्षेत्र नोंदणीत वाढ होत आहे. यावर्षी गाळपसाठी १५ हजार हेक्टर उसाची नोंद झाली आहे. ऑक्टोबरमध्ये कारखान्याचा बॉयलर पूजन व अग्नी प्रदीपन सोहळा पार पडला असून गळीत हंगामासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. गळीत हंगामासाठी यंत्रसामग्री सज्ज असून नोव्हेंबरपासून हंगामाला प्रारंभ होईल. यासाठी नियोजन सुरू आहे. जिल्ह्यात व परिसरात ऊस लागवडीचे प्रमाण चांगले आहे. ‘आयान’ च्या रूपाने हक्काचा कारखाना उपलब्ध असल्याने ऊस उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. या हंगामासाठी शेतकऱ्यांनी उसाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली. मात्र पावसाचा खंड पडल्याने पिकाची वाढ होण्यास अडचणी आल्या. त्यामुळे यावर्षी नेहमीपेक्षा साखरेचा उतारा कमी येण्याची शक्यता आहे. हा परिणाम लक्षात घेता शासनाने कारखान्यांना उसाला प्रतिक्विंटल ५०० रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. ----------- सामाजिक उपक्रमांवर भर आयान कारखाना शेतकऱ्यांच्या हिताबरोबरच सामाजिक उपक्रमांवर भर देत असतो. बेणे निवडीपासून उसाच्या मशागतीपर्यंत आणि तोडणीपासून कारखान्यात ऊस आणण्यापर्यंतचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना केले जाते. कारखान्याकडे असलेल्या कृषी तज्ज्ञांची टिम यासाठी काम करीत असते. ऊसतोड मजुरांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत हजारो हात कारखान्यासाठी राबत असतात. सध्या कारखान्याचे सहाशे कामगार असून ऊसतोडीसाठी दहा हजारापेक्षा जास्त मजुर बांधव काम करीत असतात. मजुरांच्या मुलांच्या शिक्षणात कोणताही खंड पडू नये म्हणून कारखाना परिसरात दरवर्षी दोन साखर शाळा चालविल्या जातात. याशिवाय वेळोवेळी आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जाते. आयान कारखाना परिसरात वनराई तयार करण्यात आली असून हजारोंच्या संख्येने वृक्ष जगवून पर्यावरणाचे रक्षण करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Crisis: बापरे! पाकिस्तानात एका गॅस सिलिंडरची किंमत पोहचली ७ हजारांवर; कारण काय?

Prithviraj Chavan : मनोज जरांगे-पाटलांचे नेतृत्व संपवायचे त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यासारख्या नेत्यांना बदनाम करण्याचा कुटील डाव

Sukanya Samruddhi Yojna : घरात तीन मुली आहेत? मग टेन्शन सोडा; जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमांतर्गत कशी उभी राहील कोटींची संपत्ती!

Career Growth: ज्याला तीन लाख वार्षिक पगाराच्या कामावरून कंपनीने काढलं, त्याच तरुणाला आली दुबईतील १.५ कोटींच्या नोकरीची ऑफर

पुढच्या सात दिवसांत ४ राशींचं नशीब चमकणार! धनलाभासह करिअरमध्ये प्रगतीचे योग

SCROLL FOR NEXT