नाशिक

दहा दिवसांच्या नकोशीला टाकले मुंग्यांच्या वारुळावर

CD
NSK26H33318 जळगाव : जिल्हा सामान्य रुग्णालयात बाळाच्या प्रकृतीची माहिती डॉ. शैलजा चव्हाण यांच्याकडून जाणून घेताना जिल्‍हाधिकारी रोहन घुगे, पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे. --- ‘नकोशी’ला सोडले मुंग्यांच्या वारुळाजवळ --- माणुसकीच्या धाडसाने मिळाला पुर्नजन्म; जिल्हाधिकारी, एसपींनी घेतली भेट सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १ : जन्मदात्या आईनेच नाकारलेल्या अवघ्या दहा दिवसांच्या चिमुरडीला निर्जनस्थळी मुंग्यांच्या वारुळाजवळ सोडून पलायन केले. मात्र, रडणाऱ्या बाळावर एका पेंटरचे लक्ष गेले आणि त्याने चिमुरडीचे प्राण वाचविले. रंगकाम करणाऱ्या नागरिकाने माणुसकीचे रंग जपत मानवतेचे अनोखे चित्र समाजासमोर उभे केले. गिरणा पंपिंग रोडवरील रेल्वेपुलाजवळ आजादनगर-पिंप्राळ्याकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्याच्या बाजूला रात्री दहाच्या सुमारास स्त्री जातीचे अर्भक रडताना आढळले. देव तारी त्याला कोण मारी! पेंटर शिवाजी मधुकर गायकवाड (वय ३५, रा. हरिविठ्ठलनगर) कामावरून घरी जाताना बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून थांबले. मुंग्या लागलेल्या चिमुरडीला त्यांनी तातडीने उचलून घरी आणले आणि पोलिसांना माहिती दिली. त्यांच्या समयसूचकतेमुळे बाळाचे प्राण वाचले. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, संशयित मातेचा शोध सुरू आहे. चौकट जिल्‍हाधिकारी, एसपी चिमुरडीच्या भेटीला जिल्हाधिकारी रेाहन घुगे आणि पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी ‘त्या’ बाळाची जिल्‍हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात भेट घेत प्रकृतीची चौकशी केली, तसेच तिच्या पुढील देखभाली आणि संगोपनाबाबत सविस्तर चर्चा केली. डॉ. शैलजा चव्हाण यांनी बाळाची सद्यस्थिती आणि प्रकृतीबाबत माहिती दिली. बाळाचे प्राण वाचविणाऱ्या शिवाजी गायकवाड यांचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tibet Earthquake: विनाशकारी पुरानंतर तिबेटवर मोठे संकट! भूकंपाचे जोरदार धक्के; ७ रिश्टर स्केलचे हादरे बसताच...

Parner News : अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या पारनेर जागेसाठी नीलेश लंके विरुद्ध राहुल शिंदे; थेट लढत निश्चित

M.Pharmacy Admission : एम. फार्मसीच्या चौथ्या फेरीत चार हजार १३५ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी; २४ ऑक्टोबरपर्यंत मुदत

CJP Leaders Bail Update : सौरव दास, आशुतोष रांका यांची तुरुंगातून सुटका; मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात CJP पुन्हा आक्रमक

Water Supply Scheme Issue : रखडलेल्या पाणीपुरवठा योजनांवरून जिल्हा परिषदेत वाद; आठवडाभरात अहवाल देण्याचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT