नाशिक

बागलाणला मिळाले ३२ शिक्षक

CD
पवित्रद्वारा बागलाणला दुसऱ्यांदा मिळाले ३२ शिक्षक ------------------------------------------- द्विशिक्षकी शाळांतील प्रतिनियुक्तीच्या शिक्षकांना दिलासा सकाळ वृत्तसेवा नामपूर, ता. २१ : बागलाण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांना राज्य शासनाच्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून बुधवारी (ता. २१) सुमारे ३२ प्राथमिक शिक्षक मिळाल्यामुळे तालुक्यातील द्विशिक्षकी शाळांना तात्पुरत्या स्वरूपात प्रतिनियुक्ती दिलेल्या शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे. बागलाण तालुक्यातील शाळांमध्ये काही महिन्यांपासून प्राथमिक शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने अनेक शिक्षकांचे तात्पुरते समायोजन करण्यात आले होते. जून महिन्यात काही शाळांमधील दोन्ही शिक्षक निवृत्त झाल्याने शून्य शिक्षकी शाळा निर्माण झाल्या होत्या. शिक्षक संख्या कमी असल्याने काही गावांमध्ये पालकांकडून शाळेला कुलूप लावण्याचा इशाराही देण्यात आला होता. दरम्यान, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून बुधवारी (ता. २१) तालुक्यातील विविध शाळांना उपशिक्षक मिळाले. सप्टेंबर महिन्यात तालुक्याला ४४ प्राथमिक तर ११ पदवीधर असे ५५ शिक्षक मिळाले होते. तरीही तालुक्यात शिक्षकांची अनेक पदे रिक्त होती. बागलाण तालुक्यातील रिक्त पदांचा अहवाल पंचायत समिती प्रशासनाने मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्याकडे पाठविला होता. चौकट या गावांना मिळाले शिक्षक अजमीर सौंदाणे, मोरे नगर, बिजोरसे, मुंगसे, मोराणे सांडस आव्हाटी, नवी शेमळी, बिजोटे देवठाण दिगर, जुनी शेमळी, चिंचपाडे, आनंदपूर, सावरपाडे, आनंदनगर, दोधेश्वर फाटा, केळझर, रावेर, वघानेपाडा, मळगाव (पिसोरे), देवळीशिवार, सावकीफाटा (प.), नळकस देवरेवस्ती, सुराणे, दावलपाडे, पाडगणशिवार, लोणारवाडी, कृपखेडा, टिंगरी, देवळाणे शिवार, दगडदेव, दाजीवाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावतीत पोलीस शिपायाच्या मृत्यूने खळबळ; टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी लिहिली चिठ्ठी, नेमकं काय घडलं?

Uday Samant : शिक्षकांचा आमदार शिक्षकच असावा : उदय सामंत

Das, Ranka News: CJP च्या सौरव दास, आशुतोष रांका यांना दिलासा; तब्बल ७ दिवस तिहारमध्ये राहिल्यानंतर...

Donal Trump: 'मी त्यांच्या पार्श्वभागाकडे पाहिले, पण...'! ट्रम्प यांचा 'तो' व्हिडिओ का होतोय व्हायरल?

Latest Marathi News Live Update : शेतातून सोयाबीनची २० पाेती लंपास, ४८ हजारांचा माल चोरीला

SCROLL FOR NEXT