नाशिक

बालाजी रथोत्सव सेवा

CD
धुळे : टुडे पान २ साठी.. -- फोटो क्रमांक : 33357 धुळे : ऐतिहासिक श्री बालाजी रथोत्सवात रथाला ‘मोगरी’ लावण्याची जबाबदारी पार पाडणारे गंगाराम कोळेकर (मुकादम) व त्यांचे सर्व सहकारी हमाल बांधव. -- बालाजी रथोत्सवात हमाल बांधवांची सेवा -- पिढ्यानपिढ्या विनामोबदला कार्य; नव्या पिढीलाही प्रशिक्षण सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २३ : येथील ऐतिहासिक बालाजी रथोत्सवातील धार्मिक परंपरेसोबतच निस्वार्थ सेवेचा अनोखा वारसा आजही जपला जात आहे. विशाल रथाच्या गतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी, तो वळवण्यासाठी अथवा रोखण्यासाठी मोगरी लावण्याचे कौशल्याचे आणि जोखमीचे काम गेल्या १४७ वर्षांपासून स्थानिक हमाल बांधव पिढ्यानपिढ्या विनामोबदला करत आहेत. बालाजीच्या चरणी सेवा अर्पण करण्याची भावना हेच त्यांच्या कार्याचे प्रेरणास्थान आहे. धावत्या रथाला मोगरी लावण्यासाठी प्रचंड ताकद, कौशल्य आणि प्रसंगावधानाची गरज असते. रथाच्या हालचालींचा अचूक अंदाज घेत योग्य वेळी मोगरी लावण्याची जबाबदारी हे हमाल बांधव पार पाडतात. हे कौशल्य पुढील पिढीपर्यंत पोहोचावे, यासाठी ज्येष्ठ मंडळी नव्या तरुणांना दोन ते तीन वर्षे प्रशिक्षण देतात. कामातील बारकावे आत्मसात केल्यानंतरच त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली जाते. या सेवेसाठी हे हमाल बांधव बालाजी संस्थान किंवा अन्य कोणाकडूनही मोबदला घेत नाहीत. भक्तांकडून किंवा संस्थानाकडून प्रेमापोटी मिळणारे कपडे, धोतर, शर्ट किंवा बक्षीस स्वरूपातील भेटी ते आनंदाने स्वीकारतात. - पैशांपेक्षा बालाजीची सेवा महत्त्वाची मानत त्यांनी ही परंपरा आजवर जपली असून ती भविष्यातही अखंड सुरू ठेवण्याचा त्यांचा निर्धार आहे. या सेवेत गंगाराम कोळेकर (मुकादम) यांच्यासह दत्तु पारखे, मनोज कोळेकर, गौरव खरात, अमोल ठाकुर, विजय पाटील, अनिल बोरकर, अशोक पाटील, नाना थोरात, संतोष कोकरे, चेतन बारी, नंदु जगताप, अमोल बारी, भैय्या मदने, चंदु वाघमोडे, सुरज पाटील आणि साईराज कोळेकर आदी हमाल बांधव योगदान देत आहेत.

Nanded News : नवी दिल्लीतील 'ESTIC 2026' राष्ट्रीय परिषदेसाठी डॉ. विजयकुमार जाधव यांची सलग दुसऱ्यांदा निवड!

BCCI Junior Selection Committee: भारताच्या माजी वेगवान गोलंदाजाकडे मोठी जबाबदारी! परविंदर अवाना बनले BCCI ज्युनियर निवड समितीचे अध्यक्ष

Marathi News Live Updates: नाशिक कुंभमेळ्याआधी ५५० जणांचा सामूहिक शंखनाद; गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणार

Kojagiri Purnima 2026: यंदा कधी आहे कोजागिरी पौर्णिमेचा मुहूर्त? जाणून घ्या पूजा विधी आणि पौराणिक कथा

IND W vs ZIM W: श्री चरणीची भेदक गोलंदाजी; झिम्बाब्वेचा डाव आटोपला, भारतासमोर किती धावांचं लक्ष्य?

SCROLL FOR NEXT