धुळे : टुडे पान २ साठी..
--
फोटो क्रमांक : 33289
धुळे : श्री बालाजी रथोत्सवानिमित्त गुंदेशा परिवाराच्या वतीने महाप्रसाद वाटप करताना राजवर्धन कदमबांडे. शेजारी दिलीपकुमार गुंदेशा, जोसेफ मलबारी, विमलाबाई गुंदेशा यांच्यासह गुंदेशा परिवारातील सदस्य.
--
बालाजी रथोत्सवात गुंदेशा परिवाराचा महाप्रसाद
--
माजी आमदार कदमबांडे यांचे हस्ते वाटप; १९ वर्षांची परंपरा
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २२ : शहरात श्री बालाजी रथोत्सवानिमित्त गल्ली क्रमांक चारमध्ये महाप्रसादाचे वाटप झाले. (स्व.) असलचंद गुंदेशा आणि (स्व.) मदनबाई गुंदेशा यांच्या स्मरणार्थ गुंदेशा परिवाराकडून गेल्या १९ वर्षांपासून ही सेवाभावी परंपरा जपली जात आहे. यंदाही दिलीपकुमार असलचंदजी गुंदेशा यांच्या मार्गदर्शनात उपक्रम झाला.
महाप्रसाद वाटपाचा शुभारंभ माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या हस्ते झाला. रथोत्सवाच्या मिरवणुकीतील आणि दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविकांनी दुपारपर्यंत महाप्रसादाचा लाभ घेतला. महाप्रसादात पुरी, भाजी आणि शिऱ्याचा समावेश होता. भाविकांना शिस्तबद्ध पद्धतीने प्रसाद वाटप करण्यात आले. या उपक्रमात गुंदेशा परिवारातील सदस्यांनी आणि सहकाऱ्यांनी सेवाभावी वृत्तीने सहभाग घेतला. ज्येष्ठ नेते जोसेफ मलबारी, भानुदास लोहार, चंद्रकांत महाजन, विमलाबाई गुंदेशा, सिद्धार्थ गुंदेशा, श्रीनिक गुंदेशा यांच्यासह गुंदेशा परिवारातील सदस्य उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.