पान दोन ॲंकर
----------------
33014
नाशिकः के. के. वाघ शिक्षण संस्था प्रांगणात सोमवारी दिवंगत बाळासाहेब वाघ यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बोलताना माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात. समवेत उपस्थित अन्य मान्यवर.
----
राष्ट्र उभारणीत वाघ शिक्षण संस्थेचा वाटा
बाळासाहेब थोरातः बाळासाहेब वाघ यांच्या जयंतीनिमित्त आठवणींना उजाळा
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १९ः राष्ट्र उभारणीत शिक्षण क्षेत्रात मोलाचा वाटा आहे. हेच राष्ट्र उभारणीचे काम कै. बाळासाहेब वाघ यांनी के. के. वाघ शिक्षण संस्था स्थापन करून केले. शिक्षण संस्था हे केवळ शिक्षण देण्याचे माध्यम न ठेवता संशोधन संस्था म्हणून त्यांनी भर दिला. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात आदराने त्यांचे नाव घेतले जाते, असे प्रतिपादन माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
के. के. वाघ शिक्षण संस्था, के के वाघ फाउंडेशन, श्री. बाळासाहेब वाघ वेल्फेअर फाउंडेशन आणि स्माईल व स्पिनॅच संस्था यांच्यातर्फे के. के. वाघ शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष (कै) बाळासाहेब (भाऊ) देवराम वाघ यांची ९४ वी जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. सोमवारी (ता.१९) के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालय प्रांगणात हा कार्यक्रम झाला.
याप्रसंगी माजी मंत्री गुलाबराव देवकर, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार डॉ.शोभा बच्छाव, आमदार दिलीप बनकर, देवयानी फरांदे, ॲड. राहुल ढिकले, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, मविप्रचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे, संस्थेच्या विश्वस्त शकुंतला वाघ, मविप्र माजी सरचिटणीस नीलीमा पवार, माजी नगरसेवक गजानन शेलार उपस्थित होते.
प्रारंभी विविध मान्यवरांनी व्हिडीओ स्वरुपात मनोगत व्यक्त करत आदरांजली वाहिली. तसेच कै. बाळासाहेब वाघ यांच्या जीवनावरील जीवनपटाची चित्रफित दाखविली. संस्थेचे अध्यक्ष समीर वाघ तसेच संचालक मंडळाने व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार केला.
समन्वयक डॉ. भूषण कर्डिले यांनी प्रास्ताविक केले. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे दिवंगत बाळासाहेब वाघ यांच्या आठवणींना उजाळा दिला. माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचे हस्ते अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्वायत्त विद्यापीठाअंतर्गत सर्व विभागामध्ये प्रथम आलेले विद्यार्थी रोशन मेवाडा व त्याच्या पालकांचा सत्कार केला. पुढे बाळासाहेब थोरात यांनी कै.बाळासाहेब वाघ यांचे नावे कृषी व शिक्षण क्षेत्रात दोन पुरस्कार देण्याबाबत सूचना केली.
देवकर म्हणाले, की कै. बाळासाहेब वाघ यांच्यासोबत असोसिएशनच्या स्थापनेपासून संपर्क आला. त्यांची माणसे जोडण्याचे कला व प्रत्येक क्षेत्रात वावर आणि आवाका अभूतपूर्व होता. खासदार राजाभाऊ वाजे, आमदार दिलीपराव बनकर, आमदार देवयानी फरांदे यांनी आठवणींना उजाळा दिला. संस्थेचे जनसंपर्क संचालक अजिंक्य वाघ यांनी आभार मानले. सूत्रसंचालन डॉ. व्ही.के.पाटील व स्वाती पवार यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.