भरीताच्या वांग्यांचे चित्र वापरावे
---
भरित वांग्यांची आवक वाढू लागली
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १७ : सर्वत्र प्रसिद्ध असलेल्या जळगावच्या भरित वांग्यांची बाजारात आवक वाढू लागली आहे. बाजारात शेतकऱ्यांना प्रतिकिलो २५ ते ३० रुपये, तर सरासरी २४ रुपये दर मिळत आहे. आगामी काळात भरित वांग्यांची मागणी आणि आवकही वाढण्याची शक्यता आहे.
यावल, रावेर आणि जळगाव भागांतील आठवडी बाजारात भरित वांग्यांना मागणी असते. आगामी काळात ही मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. सप्टेंबरमध्ये भुसावळ आणि जळगाव भागांत आवक सुरू झाली. ऑक्टोबरच्या अखेरीस यावल आणि रावेर भागांत आवक वाढण्यासह काढणीच्या कामालाही गती येणार आहे. यंदा वांग्यांच्या पिकाला अनुकूल वातावरणामुळे उत्पादनही वेगाने येत आहे. सध्या जळगाव आणि भुसावळ बाजारांत भरित वांग्यांची सर्वाधिक आवक होत आहे. जळगावमध्ये रोज २२ ते २८ क्विंटल आवक होत आहे.
बामणोदच्या वांग्यांना मागणी
यावलमधील बामणोद, भालोद, न्हावी, पाडळसे, सांगवी खुर्द, तसचे रावेरमधील मसकावद, रोझोदा, खिरोदा आणि चिनावल भागांत दर्जेदार वांग्यांची आवक कमी आहे. मात्र, भुसावळमधील पिंपळगाव, तळवेल, वरुणगाव, शिंदी आणि पिंपळखुटा या भागांतून भरित वांग्यांचे उत्पादन सुरू झाले आहे. जळगावमधील आसोदा, तासखेड, नशिराबाद, बेळी, जळगाव खुर्द, तुरखेडा आणि विदगाव या भागांतही वांग्यांचे उत्पादन घेतले जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.