नाशिक

इगतपुरी : विजय पगारे : इगतपुरी तालुक्यासह विविध भागात दसरा सण पारंपारिकरित्या मोठया उत्साहात साजरा :

CD
पान-१ ॲंकर IGT26B08828 इगतपुरी : तालुक्याच्या आदिवासी व दुर्गम भागात भोंडल्याच्या उत्सवांतर्गत गीत गायन करताना सहभागी महिला व चिमुकल्या. -------------- आदिवासी भागातील भोंडल्या उत्सवाची सांगता इगतपुरी तालुक्यासह विविध भागात दसरा पारंपारिक उत्साहात साजरा सकाळ वृत्तसेवा इगतपुरी, ता.२० : इगतपुरी तालुक्यासह विविध भागात साडेतीन मुहूर्तपैकी एक असलेला दसरा सण पारंपारिक उत्साहात साजरा करण्यात आला. एकमेकांना आपट्यांची पाने देऊन नागरिकांनी शुभेच्छा दिल्या. विविध व्यावसायिकांनी चांगला व्यवसाय झाल्याचे सांगितले. कापड, वाहन क्षेत्रातही समाधानकारक व्यवहार झाले. तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी आपट्यांची पाने विकण्यासाठी नागरिक झाडाखाली बसून व्यवसाय करीत होती. नागरिकांनीही दसऱ्याच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणावर विविध वस्तूची खरेदी केल्याने व्यावसायिक वर्गाने समाधान व्यक्त केले. आदिवासी भागांमधील तरुण मुली भोडाई नावाचा खेळ या काळामध्ये खेळत असतात. आदिवासी वाडीपाडयासह विविध गावातील सर्व मुली तांदूळ, पैसे गोळा करतात. नवरात्रीमध्ये या भागामध्ये हा क्रम चालू असतो. या मुलींच्या डोक्यावर एक कलश असतो. त्या कलशामध्ये शेतात असणारी नाचणी, वरईची हिरवी कणसे, भाताच्या लोंब्या, खुरासणीची फुले तसेच कुरडूची भाजी असे सर्व कलशामध्ये टाकून ते डोक्यावर घेऊन नाचत गाणी गात असतात. हा कलश म्हणजेच भोंडई असतो. दसऱ्याच्या दिवशी या उत्सवाची सांगता करण्यात येते. दसऱ्याला शेतीमध्ये असणारी जुनी अवजारे तसेच शेतीत असणारे धान्य मंदिरात घेऊन शेतकरी वर्ग पूजन करतो. शेतीला लागणारी सर्व अवजारे असो किंवा शेतीमध्ये पिकवलेले धान्याची पूजा केली जाते. सर्वत्र अगदी अन्न समृद्धीचा दसरा साजरा केला जातो. --------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात मोठा खुलासा! आधी दुसऱ्या सेलिब्रिटीला संपवण्याचा होता प्लॅन, चौकशीत काय समोर आलं?

Dussehra Shopping: आज दसरा ;वाहन, सोने, गृह, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे खरेदीवर ग्राहकांचा भर १,२०० कोटींची उलाढाल अपेक्षित

Latest Marathi News Live Update : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या मेळाव्याला सुरुवात

Dussehra 2026: खंडेनवमी आणि दसरा यात नेमका काय फरक? शस्त्रपूजा नक्की कोणत्या दिवशी करावी?

Dussehra History : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात दसरा कसा साजरा व्हायचा? इतिहासातील रंजक गोष्टी!

SCROLL FOR NEXT