नाशिक

भुसावळात मृतदेह आढळला

CD
भुसावळ येथे कुजलेल्या मृतदेह आढळला ----- दुर्गंधीमुळे प्रकार उघड; नर्मदा कॉलनीत फॉरेन्सिक पथकाकडून तपास सुरू सकाळ वृत्तसेवा भुसावळ, ता. १५ : शहरातील नर्मदा कॉलनी परिसरातील वाचनालयाच्या मागील बाजूस रेल्वेने अतिक्रमण हटविल्याने रिकाम्या झालेल्या जुन्या वसाहतीत गुरुवारी(ता.१५) सकाळी एका व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. सात नंबर पोलिस चौकीच्या मागील बाजूस हा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून, मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. परिसरातून तीव्र दुर्गंधी येत असल्याने स्थानिक रहिवाशांना संशय आला. त्यांनी परिसरात पाहणी केली असता, मृतदेह आढळून आल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यानंतर नागरिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच भुसावळ शहर पोलिस ठाण्याचे पथक, फॉरेन्सिक पथक व रेल्वे पोलिस प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक कार्यवाही सुरू केली. फॉरेन्सिक पथकाकडून घटनास्थळावरील परिस्थितीची तपासणी करण्यात आली असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने संबंधित व्यक्तीचा मृत्यू नेमका किती दिवसांपूर्वी झाला, याबाबत शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्टता येण्याची शक्यता आहे. मृत्यू नैसर्गिक, अपघाती की अन्य कारणामुळे झाला, याचा तपास सुरू आहे. काही दिवसांत दुसरी घटना भुसावळ शहरात अलीकडच्या काळात वेगवेगळ्या ठिकाणी कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने नागरिकांत चिंता व्यक्त होत आहे. काही दिवसांपूर्वी नाहाटा चौफुलीजवळील समांतर रस्त्यालगत असलेल्या नाल्यात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. परिसरात दुर्गंधी पसरल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता. आता नर्मदा कॉलनीतील जुन्या रेल्वे वसाहतीत पुन्हा मृतदेह आढळल्याने या घटनांची चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वी भुसावळ रेल्वे यार्डातील एका गोडाऊनमध्येही कुजलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह आढळला होता. मृताच्या खिशात सापडलेल्या कागदपत्रांवरून व छायाचित्राच्या आधारे त्याची ओळख योगेश विजय वाघधरे (वय २३, रा. ठाणेगाव, ता. कारंजा, जि. वर्धा) अशी पटली होती. प्राथमिक माहितीनुसार, या तरुणाने गळफास घेतल्याचे समोर आले होते. निर्जन ठिकाणांवरील देखरेखीचा प्रश्न रेल्वेच्या जुन्या वसाहती, बंद पडलेल्या इमारती व कमी वर्दळीच्या ठिकाणी मृतदेह आढळून येत असल्याने अशा परिसरातील नियमित देखरेख व पोलिसांच्या गस्तीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र, विविध ठिकाणी मृतदेह आढळल्याने या घटनांचा परस्पर संबंध आहे, असा निष्कर्ष काढता येणार नाही. सध्या नर्मदा कॉलनीतील मृत व्यक्तीची ओळख, मृत्यूचा कालावधी व मृत्यूचे कारण याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. शवविच्छेदन अहवाल व पोलिसांच्या पुढील तपासानंतरच घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

cctv video: जामनेर तालुक्यात भीषण अपघात! एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू, ट्रक चालक ताब्यात

FDA Blood Donation Rules : रक्तदान शिबिरांबाबत आयुक्त तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय!

IND vs NZ: बुमराह नसेल, तर त्याच्या जागी न्यूझीलंडविरुद्ध ODI मालिकेत कोणाची वर्णी लागणार? शमीसह तीन खेळाडूंचे पर्याय

Manoj Jarange On Farmer Relief : "५ हजारांसाठी शेतकऱ्यांनी बँकेच्या रांगेत मरायचं का?"; मनोज जरांगेंचा सरकारवर थेट हल्लाबोल, म्हणाले...

Latest Marathi News Update: कोथरुडमध्ये मद्यधुंद तरुणाची बेदरकारपणे ड्रायव्हिंग

SCROLL FOR NEXT