black magic nashik esakal
नाशिक

काळ्या बाहुलीची जादू अन्‌ पैशांचा पाऊस! नाशिकमधील प्रकार

प्रमोद दंडगव्हाळ

सिडको (नाशिक) : महापालिकेच्या सुलभ शौचालयावरील खोलीत काळ्या बाहुलीची जादू अन्‌ पैशाचा पाऊस पाडण्याचा भोंदूबाबाकडून होणारा प्रकार सामाजिक कार्यकर्त्याच्या जागरूकतेमुळे उघडकीस आला. काय घडले नेमके? (black-magic-revealed-in-nashik-marathi-news)

काळ्या बाहुलीची जादू अन्‌ पैशांचा पाऊस!

पवननगर मैदानातील शौचालयावर असलेल्या खोलीमध्ये गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी काही नागरिकांना बोलावून तंत्रमंत्राद्वारे पूजाविधी करीत पैशाचा पाऊस पडत असल्याचा चर्चा परिसरात सुरू होती. सामाजिक कार्यकर्ते भगवान मराठे यांना याची माहिती लागताच त्यांनी थेट खोली गाठली. चर्चेची खात्री करीत पोलिस व महापालिका प्रशासनाला प्रकार लक्षात आणून दिला. पोलिस व महापालिका अधिकारी घटनास्थळी पोचले असता महापालिकेच्या जागेत असलेल्या सुलभ शौचालयावर खोलीमध्ये दोन हजारांच्या नकली नोटा (एकूण पाच लाख रुपये), दोन काळ्या रंगाच्या कोंबड्या, अंडी, भगवे वस्त्र, शंख, मोहिनी वनस्पती यासह जादूटोण्याच्या वस्तू आढळून आल्या. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. आपली भोंदूगिरी उघडकीस होणार असल्याचे समजताच भोंदूबाबा फरारी झाला. जादूटोण्याच्या नावाखाली कुणाची फसवणूक झाली आहे का याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. दरम्यान, आपला फसवणुकीचा प्रकार पोलिसांपर्यंत पोचल्याचे समजताच भोंदूबाबा फरारी झाला.

या प्रकाराबद्दल समक्ष पाहणी केली असता संबंधित ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस देण्यात आलेली आहे. संबंधित ठेकेदार सुलभ इंटरनॅशनल यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले आहे. - डॉ. मयूर पाटील, विभागीय अधिकारी, महापालिका

पवननगर मैदान येथील सुलभ शौचालयाच्यावर जादूटोण्याचा प्रयोग होत असल्याचे समजताच या विषयाला वाचा फोडली. यास पोलिस प्रशासन व प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी सहकार्य केले. समाजात सुरू असलेल्या अनिष्ट प्रवृत्तींचा नाश झाला पाहिजे हाच त्यामागील प्रामाणिक हेतू आहे. -भगवान मराठे, सामाजिक कार्यकर्ते, सिडको

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना मोठा धक्का ! ९२ लाख महिलांची नावे वगळली; 'ही' मोठी कारणे आली समोर

Mumbai News: एकुलती एक मुलगी, १६ वर्षे कोमात, ३७ लाख भरपाई देण्याचे आदेश; वेदनांची भरपाई पैशात होणार नाही !

Adani समूह आता स्मार्ट मीटर कंपनी विकत घेण्याच्या तयारीत; 1500 कोटींची डील होण्याची शक्यता...

Latest Marathi News Live Update : तामिळनाडूमध्ये गोवंश हत्याबंदी लागू करण्याच्या मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्देशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

Pune News: दूषित पाण्यामुळे आरोग्याशी खेळ! कात्रजमध्ये पाणीपुरवठा विभागाचा गोंधळ; जलवाहिनीच्या गळतीमुळे पाणीटंचाई आणि दूषित पाणी

SCROLL FOR NEXT