Crowds thronged the market on Thursday evening to buy goats for Curry Eid. esakal
नाशिक

नाशिक : बकरी ईदनिमित्त बोकड बाजार गजबजला

- युनूस शेख

जुने नाशिक : बकरी ईदनिमित्त (Bakari Eid) बोकडांना मागणी वाढली आहे. फाळके रोड येथे बोकड बाजार सजला असून, सायंकाळी बोकड खरेदीसाठी मुस्लिम बांधवांची गर्दी होत आहे. रविवारी (ता. १०) मुस्लिम बांधवांकडून बकरी ईद साजरी केली जाणार आहे. ईद त्यागाचे प्रतीक असल्याने बकरी निमित्ताने कुर्बानी करण्याची प्रथा आहे. (Bokad Bazaar is full on occasion of Bakari Eid Nashik)

ईदच्या दिवसासह पुढील दोन दिवस असे तीन दिवस कुर्बानीचा धार्मिक विधी होतो. बोकडांची कुर्बानी होत असल्याने जुने नाशिक फाळके रोड येथे बोकडांचा बाजार थाटला असून, शहरासह ग्रामीण भागातून बोकड विक्रीसाठी आले आहे. दोन वर्षे कोरोना प्रादुर्भावामुळे साध्या पद्धतीने ईद साजरी करण्यात आली. शिवाय प्रशासनाकडूनदेखील बोकड बाजारास परवानगी नाकारली होती. यंदा परिस्थिती सामान्य असल्याने पुन्हा दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी बाजार गजबजला आहे. ईदला अवघे दोन दिवस राहिल्याने गुरुवारी (ता. ७) सायंकाळी मुस्लिम बांधवांनी भर पावसात बोकड खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. १५ हजारांपासून ५० हजारापर्यंत बोकड विक्रीस आले आहे. याशिवाय काही नागरिकांनी राजस्थान, पंजाबी प्रजातीचे बोकड सुद्धा विक्रीस आणले आहे. ७० हजारांपासून दीड लाखांपर्यंत हे विशेष बोकड खरेदी विक्री झाले. यंदा बाजारात बोकड आवक मोठ्या प्रमाणावर होती.

राजस्थान, पंजाबी बोकडाचे आकर्षण

बकरी ईदमध्ये कुर्बानी धार्मिक विधीस अतिशय महत्त्व आहे. असे असले तरी कुर्बानीसाठी असणारे बोकड सुदृढ असणे तितकेच आवश्यक आहे. त्यामुळे मुस्लिम बांधव रकमेची चिंता न करता चांगल्या दर्जाचा बोकड खरेदी करत असतात. त्यानिमित्त राजस्थान, पंजाबी प्रजातीचे बोकडदेखील बाजारात विक्रीस येत असतात. काही जणांनी या वर्षीदेखील असे बोकड विक्रीस आणले आहे. त्यांची उंची, शरीर बांध्यामुळे ते सर्वांचे आकर्षण ठरत आहे. जुने नाशिकमधील काही मुस्लिम बांधवांनी अशा बोकडांची खरेदी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : महापूजेवेळीही भाविकांसाठी श्री विठ्ठलाचे मुखदर्शन सुरू; पदस्पर्श दर्शनाची रांग मंदिरापासून 20 किमी अंतरावर, पंढरपुरात 30 लाखांहून अधिक भाविकांचा महापूर

What is The Significance Of Pandharpur Wari? पाऊले चालती पंढरीची वाट...

Pandharpur Ashadhi Ekadashi : "बा विठ्ठला, राज्यातील प्रत्येक शेतकरी सुखी राहू दे..."; शासकीय महापूजेनंतर CM फडणवीसांचे पांडुरंगाला साकडे

Ashadhi Ekadashi Mahapuja : '20 वर्षे एकही वारी चुकवली नाही...'; मुख्यमंत्री फडणवीसांसोबत शासकीय महापूजेचा कोणाला मिळाला मान? धाराशिवमधील शेतकरी दाम्पत्य आहे तरी कोण?

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : CM देवेंद्र-अमृता फडणवीसांच्या हस्ते विठूरायाची महापूजा; मुख्यमंत्र्यांनी काय मागितलं मागणं?

SCROLL FOR NEXT