Theft Sakal
नाशिक

कारची काच फुटल्याचा आवाज अन् साडेपाच लाखांची रोकड लंपास

प्रमोद दंडगव्हाळ

सिडको (नाशिक) : चार चाकीच्या मागील सीटवर ठेवलेले साडेपाच लाखांची रोकड काच फोडून लंपास केली. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामदास सूकर भोये (वय ५९, रा. राज्य कर्मचारी हौसिंग सोसायटी घर डी 4/6 अशोक नगर सातपूर ) यांनी मंगळवारी ( ता.१७) सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांनी सीबीएस येथील स्टेट बँकेच्या शाखेतून सात लाख रुपये रोख रक्कम काढली. ती घेऊन ते त्यांची चारचाकी कार (एम एच १५ जे आर ३०३९) ने त्यांच्या मुलाच्या सासुरवाडीला सिडकोतील हेडगेवार नगर येथे आले. त्यांनी बँकेतून काढलेली रोकड ही गाडीच्या मागच्या सीटवर पिशवीत ठेवली होती. दरम्यान ते मुलाच्या सासुरवाडी असलेल्या घरात गेले असता त्यांना गाडीची काच फुटायचा आवाज आला. त्यांनी बाहेर येऊन बघितले असता एका दुचाकीवर आलेल्या दोन व्यक्तींनी त्यांच्या गाडीची ड्रायव्हर सिटच्या मागील बाजूची काच फोडल्याचे त्यांचे लक्षात आले.

दुचाकीवर बसलेल्या मागच्या व्यक्तीच्या हातात रोकड असलेली पिशवी दिसून आली. यावरून भोये व त्यांच्या मुलांनी सदर दुचाकी स्वाराचा पाठलाग केला असता पिशवी मधून दीड लाख रुपये खाली पडले. मात्र त्यावेळी सदर भामटे पळून जाण्यास यशस्वी ठरले. या प्रकरणी भोये यांनी अंबड पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कैलास सोनवणे व अंमलदार दीपक वाणी तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Semi Final Scenario: पाकिस्तान 'उपकारा'वर जगणार, एका जागेसाठी तिघांमध्ये स्पर्धा रंगणार! जाणून घ्या मजेशीर समीकरण

Pune Metro : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो एप्रिलअखेर धावण्याची शक्यता, पण स्थानकांची कामे अपूर्णच

अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन, वडिलास भरावा लागेल १०,००० दंड! सोलापूर शहरात बेशिस्त वाहनचालकांवर ‘सिग्नल’च्या ठिकाणी पण कारवाई; १४ मार्चला लोकअदालत

President Droupadi Murmu Shegaon Visit : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शेगावात होणार आगमन; तीन हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात

PAK vs ENG, T20 WC: हॅरी ब्रूकचे विश्वविक्रमी शतक, इंग्लंड उपांत्य फेरीत! पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर? पाकड्यांची रडारड...

SCROLL FOR NEXT