स्तनाच्या कर्करोगावर दोघींनी केली मात
एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरमध्ये यशस्वी उपचार
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १८ : लग्नानंतर अवघ्या काही महिन्यातच स्तनाचा कर्करोग झाल्याचे निदान झालेल्या नवविवाहिता अन् ६५ वर्षीय महिलेनी सकारात्मकतेने कर्करोगावर यशस्वीरीत्या मात केली आहे. या दोघींवर एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरमध्ये डॉ. राज नगरकर यांनी उपचार केले. कर्करोग असाध्य आजार असल्याच्या समाजातील गैरसमजुतीला न जुमानता या दोघींनी त्यावर मात केल्याचे डॉ. नगरकर यांनी सांगितले.
मूळची पुण्याची असलेली २६ वर्षीय नवविवाहितेला तिच्या लग्नानंतर अवघ्या काही महिन्यातच तिला स्तनाचा कर्करोग असल्याचे निदान झाले. नवविवाहितेने पुण्यासह अनेक ठिकाणी यावरील उपचाराबाबत चौकशी केल्यानंतर एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरला ती आली. डॉ. नगरकर यांनी तिच्या वैद्यकीय अहवालानुसार उपचारांचे समुपदेशन केले. यामुळे नवविवाहितेसह तिचे पती, भाऊ यांच्यामुळे तिला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि तिने या उपचार पद्धतीला यशस्वीरीत्या तोंड दिल्याने आज तिने कर्करोगाला हरवून आनंदी आयुष्याला पुन्हा नव्याने सुरुवात केली आहे. तर, ६५ वर्षीय सुशिक्षित महिलेने केवळ समाज काय म्हणेल, यामुळे सुमारे ८ महिन्यापेक्षा अधिक दिवस स्तनाचा कर्करोग कुटूंबियांपासून दडवून ठेवला. परंतु जेव्हा असाध्य त्रास होऊ लागला तेव्हा त्या एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरमध्ये आल्या. तोपर्यंत त्यांचा कर्करोग स्टेज तीनपर्यंत पोचला होता. परंतु डॉ. नगरकर यांनी केलेल्या उपचारांनीही त्यांनी कर्करोगावर यशस्वीरीत्या मात केली आहे.
--- कोट
(फोटो वापरावा)
महिलांनी वेळीच मेमोग्राफी ही चाचणी केली तर लवकर निदान होऊन त्यावर तात्काळ उपचार करता येतात. परंतु समाजाची भिती आणि असाध्य आजार अशा गैरसमजुतीवर महिला स्तनाचे दुखणे दडवून ठेवतात. तसे न करता त्यावर सांगितले तर वेळीच उपचार करणे शक्य आहे. यातून पूर्णतः बरे होता येते.
- डॉ. राज नगरकर, एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर, नाशिक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.