Nashik Crime News esakal
नाशिक

कुंभारवाडा भागात घरफोडी; 1 लाख रुपयांचा ऐवज लंपास

- युनूस शेख

जुने नाशिक : अमरधाम रोड कुंभारवाडा भागात घरफोडी (Burglary) झाल्याची घटना बुधवारी (ता. ८) घडली. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात अज्ञात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. (Burglary in Kumbharwada area Nashik Crime News)

तक्रारदार आशा राऊत या बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी गेल्या. खालच्या रूममध्ये पती झोपलेले होते. त्या घरी परतल्यानंतर त्यांनी त्यांच्या मुलीस घराच्या वरच्या मजल्यावर कपाटामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने आणण्यास सांगितले. त्यांची मुलगी वरच्या रूममध्ये गेली असता, सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. दागिने ठेवलेले बॉक्स रिकामे होते. त्यांनी खाली येऊन सर्व प्रकार सांगितला. प्लॅस्टिक पिशवीत ठेवलेले चाळीस हजारांची रोख रक्कम त्यांना आढळून आली नाही. वरील मजल्यावरील रुमचे दार उघडे असल्याची संधी साधत अज्ञात संशयितांनी चोरी केली असल्याची खात्री होताच, त्यांनी पोलिसांना माहिती दिली. ४० हजार रोख रक्कम, ५० हजार रुपये किमतीचे सोन्याची साखळी, अंगठी, कानातले अशा विविध सोन्याचे दागिने, तसेच वीस हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने असा एकूण १ लाख १० हजारांचा ऐवज चोरी गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT