Container fire. esakal
नाशिक

Nashik News : सिडकोत द बर्निंग कंटेनर; सुदैवाने जीवितहानी टळली

सकाळ वृत्तसेवा

सिडको : येथील महिंद्रा हाऊस समोर उड्डाण पुलावर रविवारी (ता.११) रात्री सव्वा नऊच्या सुमारास मुंबईहून जळगावकडे जाणाऱ्या कंटेनरच्या कॅबिनला अचानक आग लागली. यात कॅबिन पूर्णपणे जळून खाक झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. (Burning Container no casualities Nashik Latest Marathi News)

हेही वाचा : सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

मुंबईहून जळगावच्या दिशेने जात असताना मुंबई आग्रा महामार्गावरील महिंद्रा हाऊस बस थांब्यानजीक कंटेनर (एमएच ४६ एएफ ७८५७) अचानक पेटला. वाहन चालक अनुसिंग पटेल याने तत्काळ कंटेनर रस्त्याच्या कडेला घेत गाडीतून उडी मारली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते पिंटू काळे यांनी घटनास्थळावर धाव घेत लागलीच अग्निशमन विभागाच्या सिडको कार्यालयास फोन केला. काही वेळात गाडीला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवता आले असले तरी मात्र तो पर्यंत कॅबिन पूर्ण जळून खाक झाले होते.

घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. प्रसंगी अंबड पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली असून यावेळी प्रशांत जाधव, समाधान ठोके, संदीप पवार, दीपक सोनावणे, प्रदीप चव्हाण यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिस प्रशासनास मदत केली. तर अग्निशमन विभागाचे संजय गाडेकर, अविनाश सोनवणे, सोमनाथ शिंदे आदींनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT