Canara Bank ATM in Vitthal Complex was broken by unknown thieves nashik crime news esakal
नाशिक

Nashik Crime News : कॅनरा बँकेचे एटीएम फोडले

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : येथील मुंबई आग्रा महामार्गावर सायखेडा फाट्याजवळ असलेल्या विठ्ठल कॉम्प्लेक्स मधील कॅनरा बँकेचे एटीएम अज्ञात चोरट्याने फोडले. (Canara Bank ATM in Vitthal Complex was broken by unknown thieves nashik crime news)

ओझरहून नाशिककडे जाताना डाव्या बाजूस कॅनरा बँकेची शाखा आहे त्याला लागून एटीएम देखील आहे. शनिवारी (ता ८) मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास तोंडाला मास्क लावून दोन चोरट्यांनी मशीन फोडले. आधी एक जण आत गेला आणि काही वेळाने बाहेरची परिस्थिती सामसुम पाहून दुसऱ्याने आत प्रवेश केला.

त्यांनी हातातील लोखंडी वस्तूच्या आधारे मुख्य दार फोडले. परंतु बँकेंना तीन दिवस सुट्ट्या असल्याने मशीन मध्ये रक्कम मिळाली नाही. दरम्यान सकाळच्या सत्रात एक ग्राहक जेव्हा पैसे काढायला गेला तेव्हा त्याला हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर स्थानिक जागा मालकांनी बँकेच्या व्यवथापकांना संपर्क केला. त्यानंतर सबंधित अधिकारी आणल्यानंतर पोलिसांनी इतर बाबी तपासल्या.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

त्यात सीसीटिव्ही फुटेज देखील तपासून ताब्यात घेण्यात आले. रविवारी सकाळी उशिरा श्वान पथकाला पाचारण करण्यात आले.

परंतु कोणताही सुगावा लागू शकलेला नाही. दरम्यान स्थानिक प्रबंधक तृषिता आचार्य यांच्याशी अधिक माहिती घेतली असता त्यांनी मशीनचे मोठे नुकसान झाले आहे. बँक एटीएम मध्ये किती रक्कम होती आणि किती रक्कम काढली गेली याचा तपशील लवकरच मिळेल असे सांगितले. ओझर पोलिसांनी सदरचा परिसर सिल केला असून पुढील कार्यवाही पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी हे करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT