Donation esakal
नाशिक

Nashik: श्री सप्तश्रृंगी सभामंडप जीर्णोद्धार प्रकल्पासाठी रोख रक्कम अन लक्ष्मी अलंकार अर्पण

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : मुंबई येथील भाविक श्रीमती लक्ष्मी मंगलाप्रसाद उपाध्याय परिवाराने श्री सप्तश्रृंग निवासिनी देवी ट्रस्ट अंतर्गत कार्यान्वित केलेले श्री भगवती मंदिर सभामंडप जीर्णोद्धार प्रकल्पासाठी ३ लक्ष रुपयांचे दान तसेच श्री भगवती ३३ ग्रॅम वजनाचा लक्ष्मी अलंकार (अंदाजित मूल्य रु. २.२५ लक्ष) अर्पण करून अनोखे दातृत्व दर्शविले आहे. (Cash and Lakshmi Alankar donation for Shree Saptashringi Sabhamandap Restoration Project nashik news)

श्री भगवतीचे भक्त असलेले उपाध्याय कुटुंबीय हे सातत्याने श्री भगवती दर्शनासाठी आले असतां मा विश्वस्त ऍड श्री दिपक पाटोदकर व क्षेत्र पुरोहित यांनी त्यांना विश्वस्त संस्थेच्या वतीने सुरू असलेल्या विकास कार्य व भाविकांच्या सेवा सुविधांची प्राथमिक माहिती दिली प्रसंगी त्यांनी श्री भगवती सेवेत काहीतरी योगदान देणे बाबत ईच्छा व्यक्त केली असता त्यांशी आवश्यक तो समन्वय करण्यात आला.

आज गुरूवार, दि. १५/०६/२०२३ रोजी सहकुटुंब श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथे भेट देवून श्री भगवती आरती करून रु. ३ लक्ष रकमेचा धनाकर्ष व ३.३ तोळे वजनाचा लक्ष्मीहार हा मा. विश्वस्त ऍड श्री दिपक पाटोदकर यांकडे पूर्व संकल्पनेच्या संदर्भासह सुपूर्त केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

प्रसंगी त्यांना भक्तनिवास, प्रसादालाय तसेच इतर अनुषंगिक सेवा-सुविधेची माहिती दिली. संस्थेच्या व्यवस्थापन व प्रशासन कामकाज तसेच समन्वयाचे विशेष कौतुक करून भविष्याकाळात श्री भगवती चरणी सेवा देण्याची ईच्छा दर्शविली. प्रसंगी त्यांचा यथोचित सन्मान विश्वस्त संस्थेच्या वतींने करण्यात आला.

प्रसंगी मा विश्वस्त ऍड दिपक पाटोदकर, सनदी लेखापरीक्षक महावीर कटारिया, विश्वस्त संस्थेचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, अधीक्षक प्रकाश जोशी, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, सुरक्षा अधिकारी यशवंत देशमुख, रोप वे व्यवस्थापक श्री राजीव लुम्बा, कमलाकर गोडसे, क्षेत्र पुरोहित श्रीकांत दीक्षित, जयेश दीक्षित, सौ माधुरी दीक्षित, ग्रामपंचायत सदस्य संदीप बेनके, ग्रामस्थ तुषार बर्डे, निलेश कदम यासह भाविक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: भारतीय शेअर बाजारात भूकंप! बाजार उघडताच सेंसेक्स 1,600 अंकांनी कोसळला; कोणते शेअर्स घसरले?

T20 World Cup: आज मिळणार पहिला फायलिस्ट! दक्षिण आफ्रिका - न्यूझीलंडमध्ये ईडन गार्डन्सवर रंगणार सेमीफायनल

Latest Marathi News Live Update : बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरणात नाशिकमधील डॉक्टर ताब्यात

Galli Brothers : दुबईतील गलाई बांधव सुरक्षित; युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशांमध्ये चिंतेचे वातावरण

Shahbaz Sharif Viral Post : 'कंडेम' लिहायच्या नादात लिहिलं 'कंडोम'! पाकिस्तानच्या पंतप्रधानांची मोठी घोडचूक; 'तो' स्क्रीनशॉट होतोय जगभर व्हायरल

SCROLL FOR NEXT