नाशिक

चोरीची बैलजोडी हस्तगत

CD
पहूर पोलिसांकडून चोरीची बैलजोडी हस्तगत; दोघे ताब्यात -------- कारवाईत अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त सकाळ वृत्तसेवा जामनेर, ता.२३ : तालुक्यातील पिंपळगाव गोलाईत शिवारातून चोरीस गेलेली बैलजोडी हस्तगत करून पहूर पोलिसांनी गुरेचोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. या कारवाईत दोन बैल आणि चोरीसाठी वापरण्यात आलेला टेम्पो असा एकूण दोन लाख ८५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, चोरीची बैलजोडी खरेदी करणाऱ्याविरुद्धही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. पिंपळगाव गोलाईत शिवारातील शेतातून फिर्यादीच्या मालकीचे दोन बैल चोरीस गेले होते. या बैलजोडीची किंमत एक लाख पाच हजार रुपये होती. याप्रकरणी पहूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पहूरचे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण दातरे यांना गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार दातरे यांनी पथक तयार करून तपास सुरू केला. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित संजय प्रल्हाद पाटील आणि ज्ञानेश्वर गणपत पाटील (दोघे रा. सोनाळा, ता. जामनेर) यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या दोघांची सखोल चौकशी केली असता, त्यांनी दिनेश ऊर्फ टेलर जगन्नाथ पाटील आणि ईश्वर कडू पाटील यांच्या मदतीने बैलजोडी चोरल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. चौकट सुनसगाव येथून बैलजोडी हस्तगत चोरी केलेली बैलजोडी सुनसगाव येथील पिंटू नावाच्या व्यापाऱ्याला विकल्याची माहिती संशयितांनी दिली. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण दातरे, पोलिस उपनिरीक्षक गणेश सुस्ते आणि पथकाने सुनसगाव येथे जाऊन तपास केला. यावेळी पिंटू ऊर्फ नरेंद्र प्रल्हाद गोखरे (रा. सुनसगाव, ता. जामनेर) यांच्या शेतात चोरीस गेलेली बैलजोडी आढळून आली. पोलिसांनी ती हस्तगत करून मूळ मालकाच्या ताब्यात दिली. चोरीचा माल खरेदी केल्याप्रकरणी गोखरे याच्याविरुद्धही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इलॉन मस्कला विसरा! इंजिनिअरिंगचं शिक्षण न घेता उत्तराखंडच्या तरुणानंही बनवली उडणारी कार; १३ वर्षांची मेहनत फळाला

Raj Thackeray: 'हा लोकशाहीचा खुन आणि बलात्कारच', व्हायरल ऑडिओ क्लिपवर राज ठाकरेंचा घणाघात; ट्विट करत म्हणाले...

Marathi News Live Updates: नाशिक-पेठ रस्त्यावर भीषण अपघात; टेम्पो आणि दुचाकीला आग, सुदैवाने जीवितहानी नाही

Pune News : रस्त्यावर फटाके फोडल्यास होणार कारवाई; पोलिसांची नियमावली जाहीर

ICICI Bank New Rules: ग्राहकांना मोठा झटका! 1 डिसेंबरपासून पैसे काढणं महागणार; EMI फेल झाल्यास दंड

SCROLL FOR NEXT