नाशिक

निहारिकाच्या मृत्यूची सीबीआय चौकशीची करावी

CD
(ॲंकरशेजारी) फोटो : NSK26H32941 नंदुरबार : पत्रकार परिेदेत बोलताना शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे समवेत अनिल कोळी, सोनाली कोळी, घारू कोळी, दादाभाऊ कोळी, सागर कोळी आदी. ------------- निहारिकाच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करावी शानाभाऊ सोनवणे : जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. १८ : जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता आठवीत शिकणारी गुणवंत खेळाडू असलेली विद्यार्थिनी निहारिका अनिल कोळी (वय १४) हिचा मृत्यू झाला आहे. या घटनेची सीबीआयमार्फत उच्चस्तरीय चौकशी करावी. तसेच, शुक्रवारी (ता. २३) नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चात खानदेशातील टोकरे कोळी, महादेव कोळी व मल्हार कोळी जमातींसह सर्वपक्षीय समाजबांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख तसेच कोळी समाजाचे नेते शानाभाऊ सोनवणे यांनी केले. येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शानाभाऊ सोनवणे म्हणाले, निहारिकाच्या मृत्यूबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. यासाठी अधिकृत कागदपत्रे, वैद्यकीय पुरावे याच्या आधारे नि:पक्ष तपास व्हायला हवा. निहारिकाचा मृत्यू नेमका कोणत्या वेळी झाला? तिची प्रकृती गंभीर असताना तिला वेळेवर वैद्यकीय उपचार मिळाले होते का? पालकांनी तिला खासगी रुग्णालयात नेण्याची विनंती केल्यावर कोणती कार्यवाही करण्यात आली? या सर्व बाबींची सखोल चौकशी व्हावी. २२ सप्टेंबरच्या रात्री हजेरी रजिस्टरमध्ये निहारिकाच्या नावासमोर असलेल्या सहीबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांचीही पडताळणी करावी. विद्यालयातील सीसीटीव्ही कॅमेरे घटनेच्या वेळी बंद होते का, असल्यास ते बंद असण्यामागचे कारण काय, याची चौकशी व्हावी, असे त्यांनी म्हटले आहे. ------ विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर निहारिकाच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यातील शासकीय, अनुदानित आणि नवोदय विद्यालयांच्या वसतिगृहांमधील सुरक्षा व्यवस्था, आरोग्य सुविधा, आपत्कालीन वैद्यकीय उपचारांची उपलब्धता, विद्यार्थ्यांच्या देखरेखीची पद्धत आणि सीसीटीव्ही यंत्रणेची तपासणी करण्यात यावी. भविष्यात अशा प्रकारची दुर्दैवी घटना घडू नये, यासाठी शासन व संबंधित प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी श्री. सोनवणे यांनी केली. या वेळी मयत निहारीकाचे वडील अनिल कोळी, आई सोनाली कोळी, घारू कोळी, दादाभाऊ कोळी, सागर कोळी आदी उपस्थित होेते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yavatmal News: सोयाबीनने ओलांडला साडेसहा हजारांचा टप्पा; अत्यल्प पावसामुळे घटले उत्पादन, बाजारात आवक कमी

Leopard Attack: नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; सर्वांसमोर नेले उचलून, चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावरुन महाकालीच्या दर्शनासाठी निघाले अन्..

वयाच्या ८८ व्या वर्षीही मर्दानी खेळांचा थरार! शांताबाई पवार यांची प्रेरणादायी कहाणी |Shantabai Pawar

रस्त्याचं काम सुरु असतानाच भरधाव कारची धडक, ८ मजुरांचा जागीच मृत्यू; अनेक जण गंभीर

Gokul Election Voting Percentage : गोकुळसाठी ९९.९६ % मतदान; सतेज पाटील, हसन मुश्रीफांची प्रतिष्ठा पणाला, उद्या मतमोजणी, कोण मारणार बाजी?, तालुका निहाय आकडेवारी

SCROLL FOR NEXT