नाशिक

कोल्हापूर विभागाकडे सर्वसाधारण विजेतेपद

CD
पान २ साठी -------- NSK26H32948 नाशिक ः यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठातर्फे आयोजित केंद्रीय युवक महोत्‍सवातील विजेता ठरलेल्‍या कोल्‍हापूर संघातील कलावंत विद्यार्थ्यांसमवेत उपस्‍थित मान्‍यवर. ----------- कोल्हापूर विभागाकडे सर्वसाधारण विजेतेपद मुक्त विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवाचा उत्साहात समारोप सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १८ः यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ येथे केंद्रीय युवक महोत्सव पार पडला. विविध स्‍पर्धांमध्ये चांगली कामगिरी करतांना कोल्हापूर विभागाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. आगामी आंतरराज्य युवक महोत्सव ‘इंद्रधनुष्य २०२६’ साठी पात्र कलाकार विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचा आविष्कार असलेल्या महोत्सवात विद्यापीठाच्या छत्रपती संभाजीनगर, नाशिक, मुंबई, नागपूर, पुणे, अमरावती, नांदेड व कोल्हापूर या आठही विभागीय केंद्रातील राज्यभरातील शंभरहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. महोत्सवात संगीत, नृत्य, वाङ्मयीन कला, रंगमंच, ललितकला या पाच मुख्य प्रकारातील एकांकिका, मुकाभिनय, मिमिक्री, प्रहसन, शास्त्रीय गायन, समूह गायन, सुगम संगीत, वाद्यवादन, समूह नृत्य, शास्त्रीय नृत्य, वक्तृत्व, वादविवाद, चित्रकला, पोस्टरमेकींग, रांगोळी, स्पॉट फोटोग्राफी, क्ले मॉडेलिंग, प्रश्नमंजुषा, शिल्पकला आदी स्पर्धा रंगल्या. प्रास्ताविक विद्यार्थी कल्याण व बहिःशाल केंद्राचे प्रमुख डॉ. दयाराम पवार यांनी केले. आभार ललित कला केंद्र संचालक सचिन शिंदे यांनी मानले. --------- स्‍पर्धेतील विजेते असे (कंसात विभाग) वादविवाद ः सुशांत गायकवाड (अमरावती), कौस्तुभ पचाडे (मुंबई), जयेश औतकर (अमरावती), क्रिश खंडेलवाल (मुंबई), श्रीधर पोळ (छत्रपती संभाजीनगर), नंदिनी शेंडे (नागपूर). वक्तृत्वः कौस्तुभ पचाडे व सानिया पाटील (मुंबई), यश दुधगावकर (कोल्हापूर), शास्त्रीय नृत्यः मिताली काळे (नाशिक), शिवांगी आखाडे व नम्रता रेटरेकर (कोल्हापूर). लोकनृत्य समूह ः स्वप्निल जत्रे व संघ (कोल्हापूर), विशाल उमटोले व संघ (मुंबई), सुहानी आठवले व संघ (अमरावती). प्रश्नमंजुषा ः श्रद्धा पाटील, आदर्श बोबडे, जयेश औतकर (अमरावती), संदीप भालेराव (नाशिक), भावेश मिस्त्री, शुभम मिस्त्री व दीक्षा काकटकर (कोल्हापूर). संगीत ः वेदश्री गवळी (पाश्चिमात्य गायन व सुगम गायन- अमरावती), कोमल बालेकुंद्री (सुगम गायन), तालवादन ः अथर्व गुलेकर (कोल्हापूर), अनिकेत जाधव (पुणे), हृषीकेश झुंबड (छत्रपती संभाजीनगर), ललित कला- रांगोळीः रोहित किर्वे (पुणे), शुभेच्छा दिगंबर (अमरावती), प्रणव सुतार (कोल्हापूर). प्रहसन ः पल्लवी लिगाडे व संघ (कोल्हापूर), समीक्षा भालेराव व संघ (कोल्हापूर), चंदना कल्याणकर (नांदेड). मुकाभिनय ः कोल्हापूर संघ, व्यंगचित्र व क्ले मॉड्यूलिंगः जयंत गिड (अमरावती), ओम पाटील (नाशिक), भित्तीचित्रेः रोहित किर्वे (पुणे), सर्वेश खंबाळ (कोल्हापूर), स्थळचित्रण ः राजनंदिनी पवार, सर्वेश खंबाळ व प्रणव सुतार (कोल्हापूर). कोलाजः विनायक चव्हाण (नाशिक), श्रुती चौगुले (कोल्हापूर), सोहेल इनामदार (नांदेड). ----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रस्त्याचं काम सुरु असतानाच भरधाव कारची धडक, ८ मजुरांचा जागीच मृत्यू; अनेक जण गंभीर

Gokul Election Voting Percentage : गोकुळसाठी ९९.९६ % मतदान; सतेज पाटील, हसन मुश्रीफांची प्रतिष्ठा पणाला, उद्या मतमोजणी, कोण मारणार बाजी?, तालुका निहाय आकडेवारी

Gokul Milk Union Election 2026 : गोकुळच्या मतदान केंद्रावर सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा; मतपत्रीकेचे फोटो व्हायरल, नजर चुकवून मोबाईलवर काढले फोटो

Tukaram Munde Viral Video : तुकाराम मुंढेंचा VIDEO व्हायरल; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याच्या मागणीशी संबंध काय?

मुंबईत नोकरी मिळाली, जॉइनिंग करण्याआधीच आक्रीत घडलं, २३ वर्षीय तरुणीला नराधमाने संपवलं, पुलावरून ओढत नेत...; कुडाळमध्ये काय घडलं?

SCROLL FOR NEXT