11th online admission esakal
नाशिक

11th admission : शाखा, महाविद्यालय पसंतीक्रमांचा भाग दोन भरण्यास सुरवात

अरुण मलाणी

नाशिक : नाशिक महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांत अकरावी प्रवेशासाठी (11th admission) राबविल्या जाणाऱ्या केंद्रिभूत प्रवेशप्रक्रियेला गती आली आहे. मंगळवारी (ता. १७) दुपारी चारपर्यंत सुमारे चौदा हजार ७०० विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज दाखल केले. दरम्‍यान, सकाळी संकेतस्‍थळात तांत्रिक बिघाड आल्‍याने नव्‍याने अर्ज भरताना अडचणी निर्माण होत होत्‍या. शाखा, महाविद्यालयांचा पसंतीक्रम नोंदविण्याकरिता महत्त्वाचा असलेल्‍या अर्जाचा भाग दोन भरण्यासदेखील सुरवात झालेली आहे. विद्यार्थ्यांना रविवार (ता. २२)पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत.


अकरावी प्रवेशाच्‍या ऑनलाइन नोंदणीप्रक्रियेला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळतोय. मंगळवारी दुपारी चारपर्यंत नोंदणी झालेल्या चौदा हजार ७०० विद्यार्थ्यांपैकी दहा हजार ५१६ विद्यार्थ्यांनी अर्ज लॉक करण्याचा पर्याय निवडला. तर आठ हजार ३४४ विद्यार्थ्यांनी पडताळणी प्रक्रिया पूर्ण केली. मंगळवारपासून अर्जाचा भाग दोन भरण्याची प्रक्रियादेखील सुरू झाली. याअंतर्गत एक हजार ५३१ विद्यार्थ्यांनी शाखा, महाविद्यालय पसंतीक्रम नोंदविण्याची प्रक्रिया पूर्ण केलेली होती. नव्‍याने अर्ज करण्यासोबत यापूर्वी अर्ज केलेल्‍या विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग दोन भरण्यासाठी रविवारी (ता. २२)पर्यंत मुदत असेल.


आयसीएसईच्‍या विद्यार्थ्यांना सूचना

दरम्‍यान, आयसीएसई बोर्डाच्‍या विद्यार्थ्यांकरिता महत्त्वाचे सूचनापत्रक मंगळवारी जारी करण्यात आले. यानुसार ज्‍या विद्यार्थ्यांना बेस्‍ट फाइव्‍हचा लाभ घ्यायचा असेल, त्‍यांनी ग्रुप एक, ग्रुप दोनमधील सहा विषयांपैकी कोणतेही पाच विषयांचे बेस्‍ट फाइव्‍ह गुण ग्राह्य धरावे किंवा दुसऱ्या पर्यायात ज्‍या विद्यार्थ्यांना ग्रुप तीनमधील गुण विचारात घेण्‍याची इच्‍छा आहे, अशा विद्यार्थ्यांचे ग्रुप एक, ग्रुप दोन व ग्रुप तीनमधील सात विषयांची (सातशे गुण) सरासरी ग्राह्य धरली जाईल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetti Protest : कोयना धरणात ८५ टीएमसी पाणी असतानाही कृष्णा नदी कोरडीच; राजू शेट्टी यांचे ठिय्या आंदोलन

IND vs NZ 2nd T20I Live: १,४३४ दिवसानंतर विकेट! भुवनेश्वर कुमारची कमाल, पण अर्शदीप सिंगचा मोठा विक्रम! टीम इंडियाचाही पराक्रम

8th Pay Commission: किमान वेतन ७२ हजारांपर्यंत वाढविण्याची वेतन आयोगाच्या मुंबईतील दोन दिवसीय बैठकीत मागणी

Latest Marathi News Live Update : पुणे शहरात बिबट्याचे दर्शन; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Video: केंब्रिजमधील त्या रेस्टॉरंटमध्ये काय घडलं? सोनिया गांधींनी सांगितली राजीव गांधींसोबतची पहिल्या भेटीची आठवण

SCROLL FOR NEXT