Nashik Municipal Corporation Sakal
नाशिक

भाजपला पुन्हा घरचा आहेर; सभापती स्वाती भामरेंचा उपोषणाचा इशारा

विक्रांत मते

नाशिक : सत्ताधारी भाजप आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी डेंगीवरून आरोग्य विभागाला टाळे लावण्याचा दिलेला इशारा, मुकेश शहाणे यांनी माहिती मिळत नसल्याने विद्युत विभागाला टाळे ठोकल्यानंतर सत्ता असूनही सत्ताधारी नगरसेवकांना आंदोलन करावे लागत असल्याने इभ्रत गेलेल्या भाजपला पुन्हा एकदा महिला व बालकल्याण समिती सभापती स्वाती भामरे यांनी कामे होत नसल्याने उपोषणाचा इशारा देत घरचा आहेर दिला.

महापालिकेत सत्तेच्या माध्यमातून मोठी कामे होत असल्याचे बोलले जाते, परंतु भाजपच्या नगरसेवकांना मात्र उलटा अनुभव येत आहे. डेंगी उपचारातून बरे झालेल्या आमदार प्रा. फरांदे यांनी शहरात मोठ्या प्रमाणात डेंगी व चिकूनगुनियाची साथ असल्याने प्रशासनाकडून कुठलीच उपाययोजना होत नसल्याने आरोग्य विभागाला टाळे ठोकण्याचा इशारा तीन दिवसांपूर्वी दिला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी नगरसेवक मुकेश शहाणे यांनी विद्युत विभागाकडून माहिती मिळत नसल्याने या विभागाला टाळे ठोकले होते.

आता त्यात महिला व बालकल्याण समिती सभापती स्वाती भामरे यांची भर पडली आहे. सोमवारी (ता.२०) झालेल्या महासभेत त्यांनी महिला व बालकल्याण समितीचा कार्यकाळ संपत आला असताना अंगणवाडी सेविकांना मानधनवाढ, बचतगट पोषण आहार ठेक्याचा प्रलंबित विषय, महिला रोजगार व प्रशिक्षण निविदेचा घोळ अद्यापही मिटला नसल्याचा आरोप करत कामे होत नसतील तर पुढल्या महासभेत उपोषणाचा इशारा दिला. प्रभारी महापौर गणेश गिते यांनी दखल घेत समितीचे सर्व विषय तत्काळ मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. असे असलेतरी हा प्रकारातून सत्ताधारी नगरसेवकांचे कामे होत नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'काँग्रेस, काँग्रेस आणि फक्त काँग्रेस...;' मोदींचा केंद्रबिंदू त्याच नावाभोवती फिरला, संपूर्ण भाषणात किती वेळा उल्लेख केला?

SRH vs CSK Live: ४,४,४,४,४,६! आयुष म्हात्रेचं वादळ हेनरिच क्लासनने रोखलं; अविश्वसनीय झेल घेत हैदराबादचं मैदान गाजवलं Video Viral

होर्मुझ संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! समुद्री व्यापारासाठी ‘सुरक्षाकवच देणार; जहाजांसाठी मोठी खुशखबर

Hormuz Strait : होर्मुझ तणाव पेटला! भारतीय जहाजावर गोळीबारानंतर मोदी सरकारचा राग उफाळला; इराणी राजदूतांना समन्स

Senior Living Athashri: परांजपे स्कीम्सच्या ‘अथश्री’ला रौप्य महोत्सवी वर्षपूर्ती; वडोदऱ्यात सहा हजाराव्या ज्येष्ठ रहिवाशाला घराचा ताबा

SCROLL FOR NEXT