मेन
-----------
समोरासमोर बातम्या प्रसिध्द कराव्यात.
-------------------------------
चांदवड बैठकीत पूर्वेतील टंचाई दुर्लक्षितच
-----------------------------------
निंबाळकर : दुष्काळी मंडळातील अडचणीकडे डोळेझाक
सकाळ वृत्तसेवा
चांदवड, ता. २४ : तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत तालुक्यातील पश्चिम भागातील धरण परिसरातील शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचा खंडित वीजपुरवठा सुरू करण्याच्या मागणीवरच प्रामुख्याने चर्चा झाली. परंतु
तालुक्याच्या पूर्व भागातील पाच महसुली मंडळांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई, शेतीच्या पाण्याचा प्रश्न आणि जनावरांसाठी चारा-पाण्याची गंभीर समस्या असताना या भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न बैठकीत चर्चाच झाली नसल्याची तक्रार प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांनी केली आहे.
राहुड, केद्राई, दरसवाडी, जांबुटके आदी धरण परिसरातील शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचा वीजपुरवठा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर खंडित करण्यात आल्याचे सांगण्यात येते. या धरण परिसरातील शेतकऱ्यांनी उभ्या पिकांना पाणी देण्यासाठी वीजपुरवठा पुन्हा सुरळीत करण्याची मागणी झाली.
पूर्व चांदवड दुर्लक्षित
दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेताना संपूर्ण तालुक्यातील टंचाईची तीव्रता, पाण्याची उपलब्धता आणि प्रत्येक भागातील शेतकऱ्यांच्या अडचणी यांचाही गांभीर्याने विचार होणे अपेक्षित होते.तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची वणवण सुरू आहे. धरणांतील पाणीसाठा संपल्याने किंवा उपलब्ध पाणी अत्यंत मर्यादित झाल्याने शेतीच्या पिकांना पाणी देणे कठीण झाले आहे. जनावरांसाठी पिण्याचे पाणी आणि चारा उपलब्ध करण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले.असा आरोप केला.
कोट
आवाज कोण ऐकणार
टंचाईची परिस्थिती ज्या गावांमध्ये खरोखरच गंभीर आहे, त्या गावांनी टँकरचे प्रस्ताव दिले आहेत. मात्र, अतिशय दुष्काळी परिस्थिती असलेल्या गावांतील शेतकऱ्यांनाच बैठकीचे निमंत्रण नसल्याने त्यांना आपली व्यथा मांडता आली नाही. टंचाई निवारणासाठी घेतलेल्या बैठकीतच टंचाई जाणवली.
- गणेश निंबाळकर जिल्हाध्यक्ष प्रहार
चांदवडच्या पूर्व भागात दुष्काळाची अतिशय भयावह परिस्थिती असताना चांदवडला झालेल्या टंचाई आढावा बैठकीपासून पूर्व भागातील शेतकऱ्यांना दूर का ठेवण्यात आले. आमच्या व्यथा मांडू दिल्या नाहीत.बैठकीची पूर्वकल्पना शेतकऱ्यांना दिली गेली नाही. बैठकीला फक्त धरण क्षेत्रातीलच शेतकरी उपस्थित होते. मग दुष्काळाचा आढावा झाला कसा ?
- विजय कुंभार्डे (माजी सरपंच पन्हाळे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.