नाशिक

पुष्पगुच्छाऐवजी गुलजार यांच्या साहित्याची भेट देऊन डॉ. चंद्रशेखर क्षत्रिय यांच्याकडून मंत्री भुजबळांचा वाढदिवस साजरा

CD
(कॉमन आवृत्तीत टुडे पान एकला आज पावपेज जाहिरात आहे...कृपया फोटोसह बातमी ही कॉमनला घ्यावी...) पान-३ वर ----------------- YEO26B27188 नाशिक : ज्येष्ठ साहित्यिक गुलजार यांच्या साहित्यकृती भेट देऊन मंत्री छगन भुजबळ यांचा सत्कार करताना राष्ट्रवादी डॉक्टरचे तालुकाध्यक्ष डॉ. चंद्रशेखर क्षत्रिय. सोबत डॉ. संजय जाधव आदी. ----------------- पुष्पगुच्छाऐवजी गुलजारांच्या साहित्याची भेट डॉ. क्षत्रियांकडून भुजबळांचा वाढदिवस ःस्थानिक पदाधिकाऱ्यांकडून वह्या, साहित्य सकाळ वृत्तसेवा येवला, ता.१५ : वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी पुष्पगुच्छ न देता पुस्तकांची भेट देण्याची संकल्पना राबवत येथील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर क्षत्रिय यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. यानिमित्त ज्येष्ठ साहित्यिक गुलजार यांच्या काव्यसंग्रहाची भेट देऊन शुभेच्छा दिल्या. दरम्यान येवल्यातील हजारो पदाधिकाऱ्यांनी नाशिक येथे मंत्री भुजबळ यांना वह्या व इतर साहित्य भेट देत साधेपणाने वाढदिवस साजरा केला. मंत्री छगन भुजबळ यांचा वाढदिवस यंदा साधेपणाने साजरा करण्यात आला. नाशिक येथील भुजबळ फार्म येथे येवल्यातून शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून वह्या, पुस्तके आणि शैक्षणिक साहित्य भेट देण्यावर हितचिंतक व कार्यकर्त्यांनी भर दिला. डॉ. क्षत्रिय यांनी मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन त्यांना काव्यसंग्रह प्रदान केला. नेहमीच्या पुष्पगुच्छांपेक्षा साहित्याची निवड करत त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छांना वैचारिक आणि साहित्यिक मूल्यांची जोड दिली. ही आगळीवेगळी भेट स्वीकारताना भुजबळांनाही स्मितहास्य आवरता आले नाही. डॉ. चंद्रशेखर म्हणाले,‘ मंत्री भुजबळ यांना वाचनाची आणि साहित्याची आवड आहे. त्यामुळे त्यांना शुभेच्छा देताना गुलजार यांचा काव्यसंग्रह भेट दिला. यापुढेही गोरगरीब रुग्णसेवेसह पर्यावरण संवर्धनाचे उपक्रम राबविले जातील असेही त्यांनी सांगितले. १६-१ पदाधिकाऱ्यांकडून अभीष्टचिंतन नाशिक येथील भुजबळ फार्म हाऊसवर मंत्री छगन भुजबळ यांना शुभेच्छा देण्यासाठी येवल्यातील हजारो पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली होती. सहकार नेते अंबादास बनकर, माजी सभापती संभाजीराजे पवार, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, जलसिंचन सेलचे जिल्हाध्यक्ष मोहन शेलार, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर दराडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष भगवान ठोंबरे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दीपक गायकवाड, गटनेते दीपक लोणारी, नगरसेवक शंकर मांजरे, प्रवीण बनकर, बाजार समितीचे सभापती वसंतराव पवार, उपसभापती रतन बोरणारे, संचालक किसन धनगे, संजय बनकर, अल्केश कासलीवाल, समता परिषदेचे शहराध्यक्ष भूषण लाघवे, खरेदी-विक्री संघाचे संचालक सुमीत थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल शिंदे, नगरसेवक गटनेते गणेश शिंदे, शहराध्यक्ष दत्ता निकम, मकरंद सोनवणे, प्रवीण बनकर, संतोष खैरनार, भाऊसाहेब धनवटे आदींसह सर्व क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या. ----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Strict Action : मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग अन् भेसळीला पूर्ण बंदी! आयुक्त तुकाराम मुंढेंकडून कडक नियमावली जारी; नियम मोडल्यास थेट कारवाई

Neha Bora: 'सीजेपी'च्या पत्रकार परिषदेत गोंधळ अन् घोषणाबाजी; आंदोलनाची पुढची दिशा केली स्पष्ट

Latest Marathi News Update: ‘मकोका’तील फरार आरोपीला आंध्र प्रदेशातून अटक

Medical Courses : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या फेरीतील प्रवेशासाठी शुक्रवारपर्यंत मुदतवाढ

नाना पाटेकरांनी सिंहगडाच्या पायथ्याशीच फार्महाऊस का बांधलं? पुरुषोत्तम बेर्डेंनी सांगितलं कारण, म्हणालेले- इथून महाराजांचे...

SCROLL FOR NEXT