नाशिक

नामदार छगनरावजी भुजबळ शून्यातून विश्व निर्माण करणारा सहृदयी योद्धा!

CD
पान दोन ॲंकर ---------------------- शून्यातून विश्व निर्माण करणारा योद्धा! विकासाला समतेच्या विचारांची दिशा देणारे लोकनेते एखाद्या व्यक्तीच्या वाट्याला आयुष्यात थोडीफार प्रतिकूलता येतेच. मात्र, काही व्यक्तिमत्त्वांच्या जीवनात प्रतिकूलता ही एखाद्या प्रसंगापुरती मर्यादित नसते; ती जन्मापासूनच डोंगराएवढे आव्हान बनून उभी असते. अशा परिस्थितीत परिस्थितीसमोर हार न मानता, संघर्षालाच आपले सामर्थ्य आणि कष्टांनाच आपले भांडवल बनवून स्वतःचे विश्व निर्माण करणारी माणसे इतिहासात आपले स्वतंत्र स्थान निर्माण करतात. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनातील असेच एक संघर्षशील, कणखर आणि सहृदयी व्यक्तिमत्त्व म्हणजे मंत्री छगन भुजबळ! - प्रा. ज्ञानेश्वर दराडे, जिल्हाध्यक्ष समता परिषद नाशिक १५ ऑक्टोबर १९४७ रोजी नाशिक येथे जन्मलेल्या छगन भुजबळ यांचा जीवनप्रवास केवळ एका राजकीय नेत्याच्या यशाची कहाणी नाही; तो प्रतिकूल परिस्थितीवर मात करणाऱ्या जिद्दीचा, सामाजिक समतेसाठी झटणाऱ्या विचारांचा आणि जनसामान्यांशी नाळ जोडून ठेवणाऱ्या नेतृत्वाचा प्रेरणादायी आलेख आहे. गरिबीने त्यांच्या स्वप्नांना मर्यादा घातल्या नाहीत; उलट त्या स्वप्नांना अधिक व्यापक बनवले. परिस्थितीपुढे झुकण्याऐवजी परिस्थिती बदलण्याची जिद्द त्यांनी बाळगली. महाविद्यालयीन जीवनात असताना साहेबांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात शिवसेनेच्या माध्यमातून झाली. शाखाप्रमुख म्हणून काम करताना त्यांनी जनसंपर्क, संघटनकौशल्य, धडाडी आणि प्रश्नांचा पाठपुरावा करण्याची वृत्ती विकसित केली. १९७३ पासून स्थानिक स्वराज्य संस्थेतील कामातून त्यांनी मुंबईच्या नागरी प्रश्नांचा अभ्यास केला आणि लोकांच्या अपेक्षा समजून घेतल्या. १९८५–८६ आणि १९९०–९१ या काळात त्यांनी मुंबईचे महापौरपद भूषविले. मुंबईतील राजकारणात स्वतःचे स्थान निर्माण केल्यानंतर छगन भुजबळ यांनी महाराष्ट्राच्या विधिमंडळात प्रवेश केला. १९८५ मध्ये माझगाव मतदारसंघातून ते विधानसभेवर निवडून आले. पुढे १९९१ मध्येही त्यांनी विधानसभा निवडणूक जिंकली. १९९६ ते १९९९ या काळात त्यांनी महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून काम केले. शिवसेनेची आणि साहेबांची मंडल आयोगावरती भूमिका विरोधाभासी ठरली भुजबळ साहेबांना मंडळ आयोगामार्फत मागासवर्गीयांना आरक्षणाची संरक्षण प्राप्त करून घ्यायचे होते आणि त्यामुळे त्यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला. १९९१ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर शरद पवार यांनी १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यानंतर छगन भुजबळ हे त्या पक्षाच्या संस्थापक नेतृत्वातील प्रमुख चेहऱ्यांपैकी एक बनले. ऑक्टोबर १९९९ ते जानेवारी २००३ या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री आणि पर्यटनमंत्री म्हणून काम केले. त्यानंतर जानेवारी ते डिसेंबर २००३ या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. नोव्हेंबर २००९ मध्ये ते पुन्हा उपमुख्यमंत्री झाले. महसूल, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम, गृह आणि पर्यटन यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांचा अनुभव त्यांच्या राजकीय कारकिर्दीत महत्त्वाचा ठरला. सार्वजनिक बांधकाममंत्री म्हणून पायाभूत सुविधांच्या विकासाशी संबंधित जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या. प्रशासनातील अनुभव, निर्णयक्षमता आणि कामाचा पाठपुरावा ही त्यांच्या नेतृत्वाची महत्त्वाची वैशिष्ट्ये राहिली. --- महात्मा फुले समता परिषद छगन भुजबळ यांनी १ नोव्हेंबर १९९२ रोजी महात्मा फुले समता परिषदेची स्थापना झाली. सामाजिक विषमता दूर करणे, बहुजन समाजात जागृती निर्माण करणे, वंचित आणि उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देणे तसेच महापुरुषांचे विचार समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचविणे, ही या चळवळीची प्रमुख उद्दिष्टे राहिली आहेत. महापुरुषांच्या विचारांचा गौरव केवळ जयंती-पुण्यतिथीपुरता मर्यादित न राहता तो समाजाच्या आचार-विचारांत उतरावा, अशी अपेक्षा या वैचारिक प्रवासामागे दिसून येते. मागासवर्गीयांच्या आरक्षणाबरोबरच महापुरुषांच्या विचारांची जनजागृती व त्यांच्या स्मारकांची उभारणी हे समता परिषदेचे मोठे योगदान आहे व यामागे भुजबळ साहेबांची दूरदृष्टी दिसून येते. ---- येवला मतदारसंघाशी नाते छगन भुजबळ यांच्या राजकीय प्रवासात येवला मतदारसंघाला विशेष स्थान आहे. २००४ मध्ये ते येवला विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर २००९, २०१४, २०१९ आणि २०२४ मध्येही त्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेली निवडणूक विजयाची त्यांची पाचवी वेळ ठरली. येवला आणि भुजबळ साहेब हे एक अनोखे नाते तयार झाले आहे. सर्वसामान्य येवलेकर ते इथले व्यावसायिक, उद्योजक, व सर्वच क्षेत्रात काम करणारे लोक यांच्याशी भुजबळ साहेबांचा वैयक्तिक स्नेह स्थापित झाला आहे. येवला आणि नाशिक जिल्ह्याच्या राजकीय-सामाजिक जीवनात त्यांचे स्थान केवळ एका लोकप्रतिनिधीपुरते मर्यादित नाही. नेतृत्व म्हणजे केवळ पद मिळविणे नव्हे, तर लोकांमध्ये विश्वास निर्माण करणे, प्रश्न समजून घेणे, संघटन उभे करणे आणि सामाजिक परिवर्तनासाठी प्रयत्नशील राहणे, हा संदेश त्यांच्या वाटचालीतून घेता येतो. त्यांच्या सार्वजनिक जीवनाचे मूल्यमापन करताना त्यांच्या योगदानाबरोबरच लोकशाहीतील प्रत्येक नेत्याप्रमाणे त्यांच्या निर्णयांचे आणि भूमिकांचे चिकित्सक मूल्यमापन होणेही आवश्यक आहे. लोकशाही अधिक सक्षम होते ती संवाद, जबाबदारी, पारदर्शकता आणि जनतेप्रती उत्तरदायित्व यांच्या बळावर. आणि हे उत्तरदायित्व साहेबांनी नेहमीच निभावली आहे हे विशेष! आणि हेच जनते प्रतीचे उत्तरदायित्व संवाद जबाबदारी आणि पारदर्शकता त्यांनी आमदार पंकज भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांच्यामध्ये रुजवली आहे...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meerut Blue Drum Murder : देशभरात गाजलेल्या 'निळा ड्रम' हत्याकांडाचा निकाल; मुस्कान रस्तोगी आणि प्रियकर साहिल शुक्लाला थेट फाशीची शिक्षा!

पांढऱ्या भिंती, बेड नाही, सोफा नाही; सुशांत सिंह राजपूतच्या घरात अशी राहतेय अदा शर्मा; म्हणते- ज्यांना बसायचंय त्यांनी...

Maharashtra Live News : इम्पेरियल हाईट्समधील आगीवर ७ तासांनंतर नियंत्रण; २ महिलांचा होरपळून मृत्यू, कोट्यवधींचे नुकसान

Mohol Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी व चाऱ्यासाठी मोहोळ तालुका त्रासला; खंडाळी ग्रामस्थांचे उपोषण सुरू

ICC T20I Ranking: ईशान किशन-अभिषेक शर्माला टक्कर देणार श्रेयस अय्यर! क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप

SCROLL FOR NEXT