Citylinc esakal
नाशिक

Nashik Citylinc Protest : सणासुदीत सिटीलिंक चालक, वाहकाच्या संपाची शक्यता

सकाळ वृत्तसेवा

Nashik Citylinc Protest : दंडाच्या रक्कमेचे समायोजन होत नसल्याने आता वाहकांचा पुरवठा करणारे पुरवठादारच संपावर जाणार असून, ऐन सणासुदीत नाशिककरांना संपाचा सामना करावा लागणार आहे. (Citylink driver carrier likely go on strike nashik news)

महापालिकेच्या सिटीलिंक कंपनीकडून ‘ग्रॉस टू कॉस्ट’ तत्त्वावर बससेवा चालविली जाते. चालकांना किलोमीटरप्रमाणे पैसे अदा केला जातात. त्याचबरोबर चालक, वाहक तसेच तिकीट संकलनासाठीदेखील पुरवठादारांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु बससेवा सुरू झाल्यापासून पाचवेळा विविध कारणांमुळे संपाला सामोरे जावे लागला आहे.

नियमबाह्य आकारण्यात आलेला दंड कमी करावा, या मागणीसाठी मागील संप झाला. समायोजनाच्या आश्वासनानंतर संप मागे घेण्यात आला. समायोजन अद्यापही न झाले नाही.

दरम्यान, आता वाहकांकडून दिवाळी सानुग्रह अनुदानाची मागणी होत असल्याने दंडाची रक्कम समायोजित करावी अन्यथा सेवा बंद केली जाईल, असे सिटीलिंक कंपनीला कळविण्यात आले आहे.

त्यामुळे सोमवार (ता. १६) होणाऱ्या बैठकीत निर्णय न झाल्यास चालक, वाहक कुठल्याही क्षणी संपावर जाण्याची शक्यता आहे. २४० दिवसांपेक्षा अधिक काळ कार्यरत कर्मचाऱ्यांना नियमाप्रमाणे साडेबारा हजार रुपये बोनस बंधनकारक असल्याने त्यासंदर्भात माहिती मागविल्याचे सिटीलिंक कंपनीचे महाव्यवस्थापक मिलिंद बंड यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT