नाशिक

स्वच्छ, सुंदर ओझरसाठी योगदान द्यावे : प्रसाद

CD
स्वच्छ, कचरामुक्त ओझरसाठी समन्वयाने काम करा! जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे सफाई कर्मचाऱ्यांना आवाहन सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.१४ : स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त ओझर शहराच्या निर्मितीसाठी सफाई कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करावे. शहराचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व जपत ‘आमचे ओझर–आमचे तीर्थक्षेत्र’ ही संकल्पना साकार करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी (ता. १४) सेवा संकल्प अभियानांतर्गत ओझर नगरपरिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. शहरातील स्वच्छता कायम राखणे आणि नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करण्यावर त्यांनी भर दिला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेतल्या. तसेच प्रधानमंत्री आवास व रमाई आवास योजनांचा लाभ घेणे, आयुष्मान भारत कार्ड काढणे, किमान वेतनासंबंधी तरतुदींची माहिती घेणे आणि नियमित आरोग्य तपासणी करणे, अशा सूचना त्यांनी दिल्या. कार्यक्रमास नगरपालिका शाखेचे सहआयुक्त श्याम गोसावी, उपायुक्त स्नेहल विसपुते, ओझरचे मुख्याधिकारी किरण देशमुख, पाणीपुरवठा अभियंता राहूल शिंदे आणि स्वच्छता निरीक्षक गणेश महाजन उपस्थित होते. यावेळी ३१ सफाई कर्मचाऱ्यांना गणवेश प्रदान करण्यात आले. फोटो क्रमांक :- एच-32410

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 4th T20I : ९ सिक्स अन् ४ फोर... शे होपचं पुन्हा वादळी शतक अन् ३ मोठे विक्रम; गेल-लुईस सगळेच मागे पडले

Graduate Teachers Constituency Election : पदवीधर, शिक्षक निवडणुकीकडे विशेष लक्ष द्या; फडणवीसांच्या नगरसेवक आमदारांना सूचना

CM Devendra Fadnavis : पाच हजार ही आत्तापर्यंतची सर्वाधिक मदत; यापूर्वी एक हजार ते पंधराशे रुपये मिळत असत

Sugarcane Rate Agitation : ऊसदराचे आंदोलन होणार तीव्र; राजू शेट्टी उद्या येणार कृष्णा कारखान्यावर

Opposition Petition: निवडणूक आयोगाच्या निर्णयावर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी; राहुल गांधींच्या याचिकेतले नेमके मुद्दे कोणते?

SCROLL FOR NEXT