नाशिक

जिल्ह्यात स्वच्छता मोहीम

CD
धुळे : मुख्य अंकातील पानासाठी.... -- चाळीस हजार विद्यार्थ्यांचा स्वच्छतेचा धडा! -- सेवा संकल्प अभियानातून जिल्ह्यात स्वच्छता मोहीम सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १५ : स्वच्छतेचे महत्त्व केवळ पुस्तकातून न शिकता प्रत्यक्ष कृतीतून अनुभवण्याची संधी जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना मिळाली. सेवा संकल्प अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील शासकीय, अनुदानित, नामांकित व एकलव्य आश्रमशाळा, वसतिगृहांमध्ये व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या पुढाकारातून राबवलेल्या या मोहिमेत ४० हजारांहून अधिक विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला. - शाळा आणि वसतिगृहांचा परिसर स्वच्छ करण्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यदायी सवयी निर्माण करण्यावर या उपक्रमात विशेष भर देण्यात आला. स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरणात विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता. मोहिमेदरम्यान शाळांचे परिसर, वर्गखोल्या, वसतिगृहे, स्वयंपाकगृहे, भोजनगृहे, स्वच्छतागृहे आणि स्नानगृहांची स्वच्छता करण्यात आली. साचलेल्या कचऱ्याचे संकलन करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. तसेच, अनावश्यक वस्तू हटवून शाळा व वसतिगृहांचा परिसर अधिक स्वच्छ आणि नीटनेटका करण्यात आला. - ‘स्वच्छ शाळा, सुंदर शाळा आणि निरोगी विद्यार्थी’ हा संदेश देत विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमात भाग घेतला. शाळा आणि वसतिगृह स्वच्छ ठेवणे ही केवळ कर्मचाऱ्यांची जबाबदारी नसून प्रत्येक विद्यार्थ्याचाही त्यात सहभाग महत्त्वाचा आहे, याची जाणीव या उपक्रमातून करून देण्यात आली. स्वच्छता ही एका दिवसापुरती मोहीम न राहता दैनंदिन जीवनाचा भाग बनावी, यासाठी जनजागृती करण्यात आली. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनात ही मोहीम राबवण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Holiday: 15 ते 31 ऑक्टोबरदरम्यान बँकांना 12 दिवस सुट्ट्या! महाराष्ट्रात कधी बंद राहणार बँका? पाहा संपूर्ण यादी

शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून दुकानदाराला लाठ्या-काठ्यांनी मारहाण, लाथाबुक्क्याही मारल्या; CCTV व्हिडीओ समोर

Latest Marathi News Update : जमीन लिलावाच्या बहाण्याने सव्वा कोटींची फसवणूक

HP Laptop: एचपीचा प्रीमियम लॅपटॉप भारतात लाँच; तब्बल 160GB vRAM आणि जबरदस्त AI फीचर्ससह बाजारात एंट्री!

Sujay Vikhe Patil: सुजय विखे पाटील आणि विवेक कोल्हे एकत्र; रामगिरी महाराज म्हणाले, ‘खासदारकीची खुर्ची हवी’

SCROLL FOR NEXT