Chief Minister Eknath Shinde news esakal
नाशिक

पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांवर कठोर कारवाई : CM एकनाथ शिंदे

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेवरील कारवाईनंतर पुण्यात झालेल्या निदर्शनात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नाशिकमध्ये सांगितले. (CM Eknath Shinde statement about pakistan zindabad controversy Nashik Latest Marathi News)

स्वामीनारायण मंदिर लोकार्पण सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे आले होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले देश विघातक संघटनांचा चोख बंदोबस्त केला पाहिजे. केंद्रीय गुप्तचर यंत्रणांना प्राप्त झालेल्या माहितीनुसारच कारवाई केली जात आहे. देश विघातक संघटनांवर कारवाई झाल्यानंतर होत असलेल्या निदर्शनात पाकिस्तान जिंदाबाद च्या घोषणा देणे योग्य नाही अशा घोषणा देणाऱ्यांना देशात राहण्याचा देखील अधिकार नाही.

पाकिस्तान जिंदाबाद च्या घोषणा देणाऱ्यांवर राज्य सरकारने कारवाई करण्याचा निर्णय घेतला. पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर घातलेली बंदी योग्य आहे. बंदी घातलेल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांवर केंद्र व राज्य सरकारच्या गृह विभागाच्या वतीने लक्ष ठेवले जात आहे. देशद्रोही विचारांचा राज्यात प्रसार होऊ देणार नाही.

भारत जोडो यात्रेत शिवसेनेला सामावून घेतले जाण्याचा विचार सुरू आहे यावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी स्मित हास्य करत यावर मी नंतर नक्की उत्तर देईन असे सांगत वेळ मारून नेली. राज्यात सर्वसामान्य लोकांचे सरकार स्थापन झालेले आहे प्रत्येकाच्या मनातील सरकार स्थापन झाल्याने आनंद आहे सर्वांना सोबत घेऊनच पुढे जाऊ असे सरकारचे धोरण आहे.

सरस्वती चे फोटो काढणार नाही

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वी शाळांमधून सरस्वतीचे फोटो काढून त्या ऐवजी ज्यांनी सर्वसामान्यांना शिक्षणाची दारे खुले केली त्या फुले-शाहू-आंबेडकर यांचे फोटो लावण्याचे आवाहन केले होते. त्यावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी सरस्वतीचे फोटो काढले जाणार नाही असे स्पष्टीकरण देताना सर्वसामान्यांना काय वाटते तेच आमचे सरकार करेल अशी स्पष्टुक्ती जोडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Finance Manager Murder Case : ६ लाखांच्या कर्जासाठी फायनान्स मॅनेजरची हत्या; प्रेमी युगुलाचा धक्कादायक कट

Parent Care: खानगावमध्ये मातृ-पितृ सेवेला सलाम; दशक्रिया विधीत विजय बोंबले दांपत्याचा ‘उत्कृष्ट मातृ पितृ सेवा पुरस्कार’ देऊन गौरव

Duleep Trophy Final : इशान किशनचे दहावे शतक! मोहम्मद सिराजसह सर्व गोलंदाजांना चोप दिला, ४०० पारच्या दिशेने वाटचाल Video

Marathi News Live Updates : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

नवरा असावा तर असा! 'स्वतः भांडी घासतात, किचनही साफ करतात'; पतीबद्दल बोलताना श्रेया घोषाल म्हणाली...'त्यांनी मला कधीच...'

SCROLL FOR NEXT