cobra in chiken cage esakal
नाशिक

अबब! कोंबड्याच्या खुराड्यात चक्क कोब्रा घुसला अन्...

संजीव निकम

नांदगाव (जि. नाशिक) : कोब्राच्या (Cobra) नुसत्या चाहुलीने अनेकांची त्रेधातिरपीट उडते. येथून जवळच असलेल्या बेलदारवाडी घातोडी शिवारात कोंबड्याच्या (chickens) खुराड्यात भक्ष्य शोधण्यासाठी चक्क कोब्रा घुसला. कोब्रा बघून कोंबड्यानी एकच गलका केला. (cobra in chicken cage Nashik News)

मध्यरात्री तीनच्या सुमारास खुराड्यातील कोंबड्यांचा जिवाच्या आकांताने होणारा गलका ऐकून जवळच घराबाहेर खाटेवर झोपलेल्या तुकाराम तांबे यांची झोपमोड झाली. कोंबड्यांचा आवाज का होतो, हे बघण्यासाठी त्यांनी टॉर्च लावून बघितले तर खुराड्याच्या आत कोंबड्या एकमेकांवर उड्या मारत होत्या. रात्री तीनला सर्पमित्र विजय बडोदे यांना मदतीसाठी बोलावण्यात आले. बडोदे यांनी तत्काळ घटनास्थळी येऊन खुराडा उघडला आणि बघितले तर आत चार ते पाच फूट लांबीचा कोब्रा होता. चार ते पाच कोंबड्या मृतावस्थेत दिसून आल्या. तर बाकीच्या कोंबड्या दंश झाल्याने उड्या मारत होत्या. खुरड्यातील एकेक कोंबड्या बाहेर काढल्यानंतर बडोदे यांनी कोपऱ्यात फणा काढलेल्या कोब्राला रेस्क्यू केले. त्यानंतर नैसर्गिक अधिवासात सोडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rainfall Update : पुणेकरांना दिलासा ! खडकवासला धरणसाखळीतील जलसाठ्यात २४ तासांत लक्षणीय वाढ; पावसाचा जोर कायम

शेअर बाजार : फिनिक्स मिल (शुक्रवार भाव बंद : रु. २०४७.६०)

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढला ! ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

अर्थभान : पगारात भागत नाही!

आजचे पंचांग आणि दिनविशेष -०६ जुलै २०२६

SCROLL FOR NEXT