Nashik News esakal
नाशिक

Nashik News : मालेगाव आगारातील वाहकाच्या माणुसकीचे सर्वत्र कौतुक; हरवलेल्या मुलाला केले आई-वडिलांकडे सुपूर्द

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : येथील आगारातून मालेगाव ते नाशिक बस मोठ्या प्रमाणात धावतात. येथील आगारातून नाशिककडे जाणाऱ्या बसमध्ये १२ वर्षीय मुलगा हरवला होता. वाहकाने स्वखर्चाने त्याचे तिकीट काढून त्याला आई-वडिलांच्या स्वाधीन केले. वाहकाच्या या माणुसकीचे सर्वत्र कौतुक होत आहे. आगारातर्फे गुलाबपुष्प देऊन वाहक हेमंत शेवाळे यांचा सत्कार करण्यात आला आहे.

येथील आगाराच्या मालेगाव-नाशिक बसमधून गोवर्धन प्रशांत निकम (वय १२) हा शालेय विद्यार्थी प्रवास करीत होता. तिकीट काढण्यासाठी गेलेल्या वाहकाला बघून गोवर्धन सीटाखाली लपून बसला. वाहक हेमंत शेवाळे यांनी तिकिटासाठी विचारणा केली असता, गोवर्धनने मालेगावला मावशीला भेटायला आलो.

पाकीट हरवले, तिकीट काढायला पैसे नाही, असे सांगून रडायला सुरवात केली. श्री. शेवाळे यांनी त्याची शाळेची बॅग तपासली असता, त्यात पुस्तके आढळून आली. श्री. शेवाळे यांनी स्वखर्चाने नाशिकचे तिकीट काढून दिले.

माहितीवरून नाशिक येथील रुंगठा हायस्कूलमध्ये संपर्क साधला असता, शुक्रवारी गोवर्धन शाळेत आला नाही, असे शाळेतर्फे सांगण्यात आले. त्यानंतर शाळेतून त्याच्या आई-वडिलांचा मोबाईल नंबर घेऊन त्यांच्याशी संपर्क साधला असता ते रडायला लागले.

गोवर्धन मालेगाव-नाशिक बसमध्ये सुखरूप असल्याचे सांगितल्यानंतर त्याच्या आई-वडिलांच्या आनंदाला पारावार उरला नाही. नाशिक बसस्थानकात गोवर्धनला त्याच्या आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले. निकम दांपत्याने वाहक शेवाळे व चालक डी. डी. धोंडगे यांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Forecast Maharashtra : मान्सून रेंगाळला ! राज्यातील 'या' भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा, पुण्यातही तापमानात होणार वाढ

Pandharpur Vitthal: अधिक मासात विठुरायाच्या चरणी ९.४६ कोटींचे दान; १४ लाख भाविकांनी घेतलं दर्शन; हुंडी, देणग्या आणि सोने-चांदीचा वर्षाव

Police Constable Death : चंदगड हादरलं! 42 वर्षीय पोलिसानं स्वत:वर गोळी झाडून संपवलं आयुष्य; लष्करात 17 वर्षे बजावलीये सेवा, सध्या मुंबईत होते कार्यरत

Monsoon 2026: पावसाचा वेग मंदावला! अरबी समुद्रातील कोरडे वारे, बंगालचे बाष्प प्रशांत महासागराकडे, हवामानशास्त्रज्ञांनी नेमकी काय सांगितली कारणे?

शिवसेनेत पुन्हा भूकंप! ६ खासदार फुटण्याची भीती, उद्धव ठाकरे गट सक्रिय; अरविंद सावंतांचं लोकसभा अध्यक्षांना पत्र

SCROLL FOR NEXT