खड्ड्यात जाण्याची काँग्रेसकडून स्वतःच व्यवस्था
मोदींवरील वक्तव्याबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांची टीका; खर्गेंच्या वक्तव्याचा निषेध
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २६ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी बोलताना त्यांच्या आई-वडिलांबद्दल अपमानास्पद शब्द वापरणे ही काँग्रेसची वैचारिक दिवाळखोरी आहे. पंतप्रधानांबद्दल वारंवार अशा पद्धतीने टीका करून कॉग्रेसने स्वतःसाठीच खड्डयात जाण्याची व्यवस्था निर्माण केली आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केली. पंतप्रधानांबद्दल अपशब्द काढणारे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा ही त्यांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदविला.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सोमवारी (ता.२६) जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये दुष्काळ आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कॉंग्रेस अध्यक्ष खर्गेंनी पंतप्रधानांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत उपमुख्यमंत्री शिंदे यांचे लक्ष वेधण्यात आले. ते म्हणाले की, काँग्रेसच्या नेत्यांचे वक्तव्य, अपशब्द वापरले जाणे हे दुर्दैवी आणि निंदनीय आहे. देशातील १४० कोटी जनतेसाठी दिवस-रात्र काम करणाऱ्या पंतप्रधानांचा राजकीय विरोध करताना त्यांच्या कुटुंबीयांचा उल्लेख करून अपमान करणे योग्य नाही.
‘पंतप्रधानांची धोरणे, निर्णय तसेच कामकाजावर विरोधकांनी टीका करावी. पण, वैयक्तिक आणि कौटुंबिक पातळीवर जाऊन अपमानास्पद भाषेचा वापर करणे ही राजकीय संस्कृती नव्हे. अशा वक्तव्यांमुळे काँग्रेस स्वत:च राजकीय अडचणीत सापडेल, असा टोला त्यांनी लगावला.
१६-१
नाशिक, दिंडोरीचाही समावेश करू
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गांभार्य व्यक्त करताना तेराच तालुक्यांचे प्रस्ताव का पाठविले असा प्रश्न जिल्हा प्रशासनाला केला. उर्वरित नाशिक व दिंडोरी तालुक्यांचा प्रस्ताव तातडीने सादर करावा. संबंधित दोन्ही तालुक्यांचाही दुष्काळी यादीत समावेश केला जाईल, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली.
-----------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.