Bribe Crime esakal
नाशिक

Nashik Bribe Crime: निफाडचा सहकार अधिकारी ACBच्या जाळ्यात; तक्रारदाराकडे केली होती दीड लाखांच्या लाचेची मागणी

सकाळ वृत्तसेवा

Nashik Bribe Crime : सावकारीचा अहवाल सकारात्मक पाठविण्यासाठी निफाडच्या सहकार अधिकार्याने दीड लाखांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती एक लाखांची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविली.

परंतु नंतर टाळाटाळ करू लागल्याने अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाचखोर सहकार अधिकाऱ्याला अटक केली आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Cooperation officer of Niphad arrested by ACB bribe of one half lakhs demanded from complainant Nashik Bribe Crime)

निफाड येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेतील सहकार अधिकारी (श्रेणी१) राजेश शंकर ढवळे (५३, रा. कृष्णा अपार्टमेंट, चेतनानगर, इंदिरानगर, नाशिक) असे लाचखोर अधिकार्याचे नाव आहे.

तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, सावकारीचा अहवाल सकारात्मक करून वरिष्ठ अधिकार्यांना द्यावा यासाठी लाचखोर अधिकारी ढवळे याने तक्रारदाराकडे गेल्या ६ सप्टेंबर २०२३ रोजी दीड लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. ‘लाचलुचपत’च्या पथकाने पडताळणी केली होती. त्यावेळी लाचखोर ढवळे याने पंचासमक्ष तडजोडीअंती लाचेची १ लाख रुपयांची लाच स्वीकारण्याची तयारीही दर्शविली होती. 

दरम्यान, ढवळे हा सातत्याने टाळाटाळ करीत होता. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (ता.९) दुपारी लाचखोर ढवळे याने लाचेची मागणी केल्याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करीत ढवळे यास अटक केली आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर, दीपक पवार, संजय ठाकरे, अविनाश पवार, संतोष गांगुर्डे, मनोज पाटील यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT