Jan Ashirwad Yatra Nashik Sakal
नाशिक

जनआशीर्वाद यात्रेत आरोग्यमंत्र्यांकडून कोरोना नियमांची ऐशी-तैसी

प्रमोद दंडगव्हाळ

सिडको (नाशिक) : ना मास्क, ना सामाजिक अंतर, ना नागरिकांचा प्रतिसाद, ना जनतेचा आशीर्वाद… सिडकोवासीयांकडून कुठे स्वागत, केवळ काहीअंशी पक्ष कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या गराड्यात सिडको केंद्रीय कुटुंब कल्याण व आरोग्य राज्यमंत्री यांची जनआशीर्वाद यात्रा झाली.


देशाचे पंतप्रधान व मुख्यमंत्री नागरिकांसह सर्वांना कोरोना पार्श्वभूमीवर वारंवार मास्क घाला, नियम पाळा, असे वारंवार गेल्या दोन वर्षापासून बेंबीच्या देठापासून आवाहन करत आहे. असे असतानादेखील देशाच्या विशेष करून आरोग्य खात्याच्या राज्यमंत्री यांनी कोरोनाचे असतील नसतील तेवढे सर्व नियम पायदळी तुडवत सिडकोतून जनआशीर्वाद यात्रा काढून एकप्रकारे पंतप्रधानांच्याच आदेशाचे नियम धाब्यावर बसविल्याचे सिडकोवासीयांना या यात्रेच्या निमित्ताने बघायला मिळाले. या वेळी एक विशेष बाब बघायला मिळाली आणि ती म्हणजे एकीकडे पाथर्डी फाट्यावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला भाजप नेते व पदाधिकारी पुष्पहार अर्पण करत असताना समोरच नव्याने बसविण्यात आलेले व घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर यांना मात्र साधे वंदनदेखील करावेसे वाटले नाही ही बाब विशेष म्हणावी लागेल.


हा कुठला न्याय…

जनआशीर्वाद यात्रेत नाशिक पश्चिमच्या आमदार, भाजप शहराध्यक्ष, प्रदेश उपाध्यक्ष, आमदार पती या महत्त्वाच्या लोकांनी मास्क परिधान न केल्याचे प्रामुख्याने दिसून आले. शासनाचे काटेकोर नियम पाळायचे. लग्नाच्या ठिकाणी मोजकी संख्या, स्मशानभूमीत कमी लोक, आंदोलन, मोर्चे, उपोषण, निवेदन देताना बोटावर मोजण्या इतके लोक हवेत, मनपा, शासन- प्रशासन, पोलिस यांच्या परवानग्या हव्या, तर दुसरीकडे मंत्री, आमदार, खासदारांच्या जनआशीर्वाद यात्रेला मात्र पोलिस संरक्षण ! हा कुठला न्याय म्हणायचा अशा प्रकारची चर्चा यानिमित्ताने नागरिकांमध्ये दिसून आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs DC Live: टीम डेव्हिडचा पराक्रम, SIX पाहून भारी होती विराटची रिअ‍ॅक्शन; पण, कृणाल पांड्या का संतापला? Video Viral

TCS प्रकरणानंतर आणखी एक धक्कादायक घटना! तुळशी माळ काढून महिलेला दारू-सिगारेट पाजली; नंतर धमकी देत धर्मांतर अन् अत्याचार

आयुष्यात काही तरी कमी पडतंय... मराठमोळ्या अभिनेत्रीची इंस्टापोस्ट व्हायरल, मोठा निर्णय घेत म्हणाली-

RCB vs DC Live: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या वाघांची 'शेळी' झाली! दिल्ली कॅपिटल्सने भन्नाट गोलंदाजी केली; दोनशेपार जाणारा संघ ढेपाळला

Latest Marathi News Live Update: नाशिकमध्ये धर्मांतरण आणि महिला शोषण प्रकरणात नवा वळण

SCROLL FOR NEXT