corona update esakal
नाशिक

जिल्‍ह्‍यात 19 पॉझिटिव्‍ह; पुन्‍हा ओलांडला पन्नासचा आकडा

अरूण मलाणी

नाशिक : गेल्‍या काही दिवसांपासून जिल्ह्यात पुन्‍हा कोरोनाने (Corona) डोके वर काढत आहे. गेल्‍या काही दिवसांपासून दैनंदिन कोरोना बाधितांची (corona Patients) संख्या एक आकडी राहात होती. परंतु गुरुवारी (ता.९) जिल्ह्यात १९ रुग्‍णांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्‍ह (Positive Cases) आले आहे. यामुळे ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण संख्येत वाढ झाल्‍याने पुन्‍हा एकदा सक्रिय रुग्‍ण संख्येने पन्नासचा आकडा ओलांडला आहे. (Corona Updates Nashik corona update News)

देशासह राज्‍याच्‍या विविध भागांमध्ये कोरोनाचा फैलाव पुन्‍हा एकदा होऊ लागला आहे. दैनंदिन कोरोना बाधितांची संख्या वाढू लागली असल्‍याने नागरिकांच्या चिंतेत पुन्‍हा भर पडली आहे. नाशिक जिल्ह्याची परिस्थिती नियंत्रणात असताना सध्या मात्र येथील कोरोना बाधितांच्‍या संख्येत वाढ होण्यास सुरवात झाली असल्‍याने जिल्‍हावासीयांच्या चिंतेत भर पडली आहे. सावधगिरीचा उपाय म्‍हणून चाचण्यांची संख्यादेखील वाढविली आहे. दीर्घ कालावधीनंतर गुरुवारी दैनंदिन कोरोना बाधितांची संख्या दोन आकडी राहिली. दिवसभरात नाशिक महापालिका क्षेत्रात तेरा, नाशिक ग्रामीण भाग व मालेगाव महापालिका क्षेत्र येथे प्रत्‍येकी तीन रुग्‍णांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्‍ह आलेले आहेत. दुसरीकडे चौघा रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली आहे.

यातून ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण संख्या वाढून ५३ झाली आहे. या सक्रिय रुग्‍णांमध्ये नाशिक महापालिका क्षेत्रातील ३८, नाशिक ग्रामीणमधील सात, मालेगाव महापालिका क्षेत्रातील तिघांसह जिल्‍हा बाहेरील पाच बाधितांचा समावेश आहे. या ५३ बाधितांपैकी अकरा बाधितांमध्ये कोरोनाविषयक लक्षणे आढळून आलेली असून, उर्वरित ४२ रुग्‍णांमध्ये मात्र कुठल्‍याही स्वरूपाची लक्षणे आढळलेली नाहीत. सायंकाळी उशिरा ३२५ रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. नाशिक ग्रामीणमधील सर्वाधिक २१८, नाशिक शहरातील ५४, मालेगावच्‍या ५३ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती.

पॉझिटिव्‍हीटी दर २.४६ टक्‍यांवर

एरवी शून्‍य टक्‍यापर्यंत घसरलेला नाशिक जिल्ह्याचा पॉझिटिव्‍हीटी दर पुन्‍हा वाढलेला आहे. गुरुवारी जिल्ह्याचा पॉझिटिव्‍हीटी दर २.४६ टक्‍के राहिला. नाशिक शहराचा पॉझिटिव्‍हीटी दर ४.३२ टक्‍के असून नाशिक ग्रामीणचा ०.६७ टक्‍के राहिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT