cotton crop demolished latest crime news  esakal
नाशिक

अज्ञात माथेफिरूने चक्क शेतातील कपाशी उपटून फेकली!; कठोर कारवाईची मागणी

- दीपक खैरनार

अंबासन, (जि.नाशिक) : येथील बिजोरसे शिवारात अल्पभूधारक शेतक-याच्या शेतात धुडगूस करीत अज्ञात माथेफिरूने चक्क शेतातील कपाशीचे पीक (Cotton Crop) उपटून टाकल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

शेतातील कपाशीची झालेली नासधूस (Demolished) पाहुन शेतकरी महिलेने टाहो फोडत आक्रोश केला. संबंधित माथेफिरूविरोधात जायखेडा पोलिस ठाण्यात शेतकरी कुटुबियांनी तक्रार दाखल केली असून कठोर कारवाईची मागणी केली आहे. (cotton field demolished by unknown mad man nashik crime latest marathi news)

बिजोरसे शिवारात अल्पभूधारक शेतकरी प्रल्हाद लुकडू कोर व मुलगा योगेश हे गट क्रमांक १५१ क्षेत्रात शेती करतात. शेतात मोठ्या कष्टाने ठिबक संचाचा वापर करून कपाशी लागवड केली होती.

काही दिवसांत कपाशीला फुलोरा व कैरी येऊ लागताच अज्ञात माथेफिरूने काही अंशी हिरवीगार कपाशी उपटून फेकल्याने कोर कुटुंबियात संताप व्यक्त केला जात आहे. संबधित माथेफिरूने रात्रीतून प्रथम शेतातील घराचा वीजपुरवठा खंडित केला.

त्यानंतर कपाशीच्या शेतात धुडगूस करीत कपाशी उपटून फेकल्याचे शेतकरी कुटुंबियांनी सांगितले. सकाळी कुटुंबातील सदस्यांना ही बाब लक्षात येताच त्यांनी गावातील सुज्ञ नागरिकांच्या निदर्शनास आणून दिले.

मोठ्या कष्टाने लागवड केलेली कपाशीची नासधूस पाहुन भागाबाई कोर यांनी टाहो फोडात आक्रोश केला. अर्थिकसह शारीरिक संकटांचा सामना करत दिवस रात्र मेहनत करून शेतात लावलेले कपाशीचे पीक अज्ञात माथेफिरूने उपटून टाकल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

बिजोरसे येथील पोलीस पाटिल अविनाश मोरे यांनी पाहणी करून कुटुंबियांचे सांत्वन केले. योगेश कोर यांनी जायखेडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता हवालदार नानाजी पाटिल व शिवाजी गुंजाळ यांनी शेतात भेट देऊन पाहणी केली.

पिंकाचे नुकसान करणा-या अज्ञात माथेफिरूचा शोध घेऊन कठोर कारवाईची मागणी शेतकरी कुटुंबियांनी केली असून पुढिल तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस हवालदार शिवाजी गुंजाळ करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan:'धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा लोकशाहीचा मोठा विजय'; पृथ्वीराज चव्हाणांचा मोदी सरकारवर निशाणा

Maharashtra Rain Update: राज्यातील धरणांत ५६ टक्के पाणीसाठा, महिनाभरात ४७८ टीएमसीची भर; विदर्भ, मराठवाड्यात चिंता कायम

Latest Marathi News Update : शिंदेंच्या नेत्याचा अपघाती मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखावर घातपाताचा आरोप

Karj Mafi: लाखो शेतकऱ्यांना मोठा धक्का! कर्जमाफी योजनेत थेट अपात्र; सरकारच्या तिजोरीतील पाच हजार कोटींची बचत

Dharmendra Pradhan Resignation : "भाजप कार्यकर्त्यांना पदापेक्षा देश महत्त्वाचा...!" प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर अमित शहा यांची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT