फोटो : NSK26H32395
घुली- पळाशी : कापूस खरेदीस प्रारंभ करताना ॲड. राम रघुवंशी. शेजारी ठाणसिंग राजपूत, बी. के. पाटील, मधुकर पाटील, गिरीश जैन आदी.
-------
पहिल्याच दिवशी १०० क्विंटल कापसाची आवक
कापसाला प्रतिक्विंटल कमाल १० हजार रुपयांचा दर
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. १४ : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत घुली- पळाशी येथील स्व. राजीव गांधी कापूस खरेदी केंद्रात परवानाधारक कापूस खरेदीदारांमार्फत कापूस खरेदीस बुधवारी (ता. १४) जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ॲड. राम रघुवंशी यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. या वेळी पहिल्याच दिवशी १३ वाहनांमधून सुमारे १०० क्विंटल कापसाची आवक झाली. कापसाला कमाल १० हजार रुपये, तर किमान नऊ हजार ५५५ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.
--------
या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ठाणसिंग राजपूत, शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष बी. के. पाटील, बाजार समितीचे सदस्य मधुकर पाटील, किशोर पाटील, गिरीश जैन, अशोक आरडे, भारतीय कपास निगम (सीसीआय)चे केंद्रप्रमुख गजानन पिसे, बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर, राजेंद्र गिरासे, कनिष्ठ अभियंता तसेच बाजार समितीचे कर्मचारी आणि परवानाधारक कापूस खरेदीदार उपस्थित होते. कापूस खरेदी केंद्र सुरू झाल्यामुळे परिसरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आपला कापूस विक्रीसाठी उपलब्ध सुविधा मिळणार आहे. शेतकऱ्यांनी कापूस विक्रीस आणताना तो स्वच्छ व पूर्णपणे कोरडा करून आणावा, असे आवाहन सभापती ठाणसिंग राजपूत व सचिव योगेश अमृतकर यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.