Custard Apple News esakal
नाशिक

Custard Apple News : मालेगावच्या बाजारात सिताफळ दाखल

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव (जि. नाशिक) : येथील फळ बाजारात सिताफळ विक्रीसाठी दाखल झाले आहे. दररोज १२ ते १५ टन सिताफळची विक्री होत आहे. दसऱ्यापासून ग्रामीण भागातील डोंगराळ भागात असलेली सिताफळे येथे विक्रीसाठी येत आहेत. महिनाभर सिताफळाची आवक राहणार आहे. (Custard Apple entered market of Malegaon Nashik Latest Marathi News)

गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा अती पावसामुळे सिताफळाच्या आवकेत घट झाली आहे. अभोणा, जयधर, कनाशी या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने सिताफळांना आलेल्या फुलांची पडझड झाली आहे. त्यामुळे डोंगरदऱ्यात असलेल्या सिताफळांची यंदा आवक घटली आहे. येथील बाजारात डोंगरदऱ्यात असलेले गावठी सिताफळ विक्रीसाठी दसऱ्यापासून येवू लागली आहेत.

इतर सिताफळांपेक्षा या सिताफळांची चव वेगळीच असते. सिताफळांची झाडे डोंगरदऱ्यात असल्याने आदिवासी बांधव मेहनतीने फळ तोडून बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. नागरिकांकडून चांगली मागणी आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा सरासरी २०० ते २५० कॅरेट घट झाली आहे. सध्या येथे रोज आठ टन सिताफळ विक्रीसाठी येत आहेत. ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत डोंगरदऱ्यात असलेल्या सिताफळांची चव खवय्यांना चाखता येईल.

यावर्षी सुरवातीला आवक कमी असल्याने येथे कॅरेटला १३०० ते १५०० रुपये भाव मिळाला होता. सध्या ५०० ते ७०० रुपये कॅरेटनुसार विक्री होत आहे. येथील बाजारात रोज १५ टन सिताफळांची विक्री होत आहे. फळ बाजारात मुल्हेर, साल्हेर, सटाणा, कनाशी, जयधर, अभोणा या भागात मोठ्या प्रमाणात जंगले असल्याने सिताफळांच्या झाडांची संख्या लक्षणीय आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने सिताफळांच्या फुले गळाली. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी सिताफळच्या उत्पादनात घट झाली आहे.

"शहरातील फळे विक्री करणाऱ्या हातगाड्या व स्टॉलवर सिताफळ विक्रीसाठी दिसत आहे. किरकोळ विक्रीला सिताफळ ५० ते ८० रुपये किलोपर्यत विकला जात आहे. शहरातून मुंबई, नाशिक, सुरत, धुळे, मनमाड, भिवंडी या जिल्ह्यात पाठविला जात आहे. नियमित सिताफळे दिवाळी नंतर बाजारात येतील." - रफिक बागवान, विक्रेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT