Guardian Minister Dada Bhuse speaking at a worker meeting. MP Hemant Godse, Kashinath Mengal, Mithun Raut etc. on the platform esakal
नाशिक

Dada Bhuse News: खावटी कर्ज नाही, तर अनुदान देणार : मंत्री भुसे

शिवसेना शिंदे गटाच्या कार्यालयाचे उद्‌घाटन

सकाळ वृत्तसेवा

Dada Bhuse News : खावटी कर्ज नव्हे, तर शेतकऱ्यांना अनुदान म्हणून देणार आहे. शेतकरी नमन योजनेंतर्गत राज्य सरकारकडून वर्षाला सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँकेत जमा करणार आहोत, अशी माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली.

येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. आदिवासी भागातील काम मार्गी लावणारच, अशी ग्वाही त्यांनी दिली. (Dada Bhuse statement Khavati will give grants not loans nashik)

मंत्री भुसे यांचे आदिवासी नृत्य करत स्वागत करण्यात आले. त्यांच्या हस्ते शिंदे गटाच्या शिवसेनेच्या कार्यालयाचे उद्‌घाटन झाले.

खासदार हेमंत गोडसे, माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, तालुकाप्रमुख रवींद्र भोये यांनी ग्रामीण भागात उपजिल्हा रुग्णालयासह सिंचन योजना प्रभावी राबव्यात, अशी मागणी पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. पद नियुक्तींचे वाटप पालकमंत्री भुसे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. जिल्हा निरीक्षक हेमंत पवार, जिल्हाध्यक्ष अनिल ढिकले, गणेश कदम, माजी आमदार पांडुरंग गांगड, सदानंद नवले, संपत काळे, मिथुन राऊत, योगेश मस्के आदी उपस्थित होते.

तालुकाप्रमुख रविंद्र भोये यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी अरुण काशीद, पप्पू मेढे, एक लाख शेख, मुक्तार सय्यद, नितीन लाखन, अशोक लांडे, उल्हास सपकाळे आदींनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar Cabinet : नितीश कुमार मंत्रिमंडळात असणार दोन उपमुख्यमंत्री अन् २० मंत्र्यांचा समावेश!

Pune Politics : राज ठाकरेंनी अपमान केलेल्या अभिनेत्याचा भाजप प्रवेश

Angar Election: राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद का झाला? 'या' होणार बिनविरोध नगराध्यक्ष?

IND W vs BAN W: वर्ल्ड कप जिंकल्यानंतर होणारी भारतीय संघाची मालिका BCCI कडून स्थगित! जाणून घ्या सविस्तर

Ranji Trophy: महाराष्ट्राचा एकाच डावाने दणदणीत विजय; विकी ओत्सावल अन् राजवर्धन हंगारगेकरच्या मिळून ११ विकेट्स

SCROLL FOR NEXT