Nashik Municipal Corporation sakal
नाशिक

नाशिक : धोकादायक घरांचे नळ कनेक्शन तोडणार - महापालिका आयुक्त

पावसाळ्याच्या तोंडावर शहरातील धोकादायक १०७७ इमारतींना नोटिसा देण्यात आल्या असून, त्यापैकी ७८६ जणांना प्रत्यक्ष नोटिसा बजाविण्यात आल्या.

विनोद बेदरकर

नाशिक : पावसाळ्याच्या तोंडावर शहरातील धोकादायक १०७७ इमारतींना नोटिसा देण्यात आल्या असून, त्यापैकी ७८६ जणांना प्रत्यक्ष नोटिसा बजाविण्यात आल्या. महिन्यानंतर दुसरी नोटीस बजावली जाणार आहे. त्यानंतर प्रतिसाद न दिल्यास थेट वीज मीटर, नळ कनेक्शन तोडण्याची कारवाई केली जाणार आहे.

संबंधितांनी अतिधोकादायक घर रिकामे न केल्यास, वीज मीटर काढण्यापासून पाण्याचे नळकनेक्शनदेखील कापण्यात येणार आहे. तसेच पोलिस यंत्रणेद्वारे अशा घरांना रिकामे करण्याची कारवाई होणार आहे. दर पावसाळ्याच्या तोंडावर महापालिकेकडून धोकादायक व अतिधोकादायक इमारती, वाडे तसेच घरांना नोटिसा बजावल्या जातात. जुने नाशिक तसेच पंचवटी, गंगाघाट परिसरातील जुने वाडे दर पावसाळ्यात कोसळण्याच्या घटना यापूर्वी झाल्या आहेत. दरम्यान, यंदा आयुक्त रमेश पवार यांनी थेट कारवाईचे आदेश दिले आहे. यामुळे पहिली नोटीस नंतर एक महिन्याच्या काळानंतर दुसरी नोटीस बजावण्यात येणार आहे. त्यानंतरदेखील घरे रिकामे न झाल्यास जीवितहानी होणार नाही याची दक्षता घेऊन महापालिका तसेच पोलिस प्रशासनाकडून कारवाई होणार आहे. तसेच, संबंधितांची यादी वीज वितरण कंपनीला देऊन त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. यानंतर महापालिकेकडून नळ कनेक्शन देण्यात आले आहे, तेदेखील कापण्यात येणार आहे. तसेच, उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पोलिसांना दिलेल्या अधिकारअंतर्गत जीवितहानी होणार नाही याची दक्षता घेऊन पोलिस असे धोकादायक घरे, वाडे व इमारतींना रिकामे करणार आहे. भाडेकरू व घर मालक यांच्यातील वादामुळे जुने नाशिक तसेच गंगा घाट परिसरातील अनेक वाडे अत्यंत जीर्ण अवस्थेत आले असले तरी त्याबाबत कारवाई होत नाही. मात्र, महापालिका आयुक्तांच्या भूमिकेमुळे शहरातील हा जुना तसेच गंभीर प्रश्‍न मार्गी लागणार आहे.

विभागनिहाय नोटिसा

नाशिक पूर्व ११७

नाशिक पश्चिम ६००

पंचवटी विभाग १९८

नाशिक रोड ६९

सिडको २५

सातपूर ६८

एकूण १०७७

धोकादायक इमारतींमुळे जीवित व वित्तहानी होते. यामुळे आता कारवाई करण्याचे अधिकार विभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. दुसऱ्या नोटीस नंतर वीज मीटर काढणे तसेच नळ कनेक्शन बंद करण्याचे अधिकार देण्यात आले आहे. - संजय अग्रवाल, अधीक्षक, मनपा नगर नियोजन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Smartphone Ban : 'या' देशात सरकारी कर्मचाऱ्यांच्या स्मार्टफोन वापरावर बंदी, आदेश झुगारल्यास नोकरीला मुकावे लागणार, तुरुंगवासही होणार

Gokul Election Update : 'गोकुळ'च्या यादीतून ६२६ दूध संस्थांना डच्चू; ५ हजार ४७० पैकी ४ हजार ८४४ संस्थाच ठरल्या पात्र, नवी यादी जाहीर, आता कोणाचे बिघडणार गणित?

Crime News: वाळू माफियांचा रक्तरंजित हल्ला! फॉर्च्युनरमध्ये अडकवून भाजप नेत्यासह तिघांना जिवंत जाळलं

देऊळ बंद 2 साठी पैसे नव्हते तेव्हा मदतीला धावून आला शाहरुख खान, प्रवीण तरडे म्हणाले...'त्यांनी 'बिल माफ करो' म्हणत...'

Latest Marathi News Live Update : वाद मिटवण्याच्या बहाण्याने तरुणावर कोयता आणि तलवारीने जीवघेणा हल्ला

SCROLL FOR NEXT