नाशिक

राजीवनगरचा "तो "जीवघेणा खड्डा चोहबाजूनी बंदिस्त

CD
मेन -- फोटो : B12886, B12887, B12888 इंदिरानगर : आयुक्त मनीषा खत्री यांना निवेदन देताना ॲड. श्याम बडोदे, डॉ. दीपाली कुलकर्णी, सुप्रिया खोडे, ॲड. अजिंक्य साने, सचिन कुलकर्णी. दुसऱ्या छायाचित्रात मातीचा भराव टाकून ग्रीन नेटने बंदिस्त केलेला खड्डा. -- ‘तो’ जीवघेणा खड्डा चोहोबाजूनी बंदिस्त ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सकाळ वृत्तसेवा इंदिरानगर, ता. ९ : राजीवनगर भागात ७ ऑक्टोबरला रात्री रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकीसह पडल्याने पाटबंधारे खात्याचे माजी उपअभियंता प्रकाश वंडेशकर यांचा मृत्यू झाल्यानंतर अखेर जाग आलेल्या प्रशासनाने आणि कंत्राटदाराने शुक्रवारी (ता.९) घाईघाईने दुर्घटनाग्रस्त खड्ड्याभोवती मातीचा भराव टाकून ग्रीन नेट लावली; तसेच सुरक्षेचा उपाय म्हणून जुन्या पोलिस ठाण्यापासूनचा १०० फुटी रस्ता बॅरिकेड्स लावून बंद केला. दरम्यान, घटनेस संबंधित ठेकेदाराचा निष्काळजीपणा कारणीभूत असून ठेकेदाराविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी नगरसेवक तथा भाजप गटनेता ॲड. श्याम बडोदे, सुप्रिया खोडे, डॉ. दीपाली कुलकर्णी आणि अजिंक्य साने यांनी मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू असून तेथून वाहणाऱ्या नाल्याजवळ रस्त्याच्या मधोमध हा १५ फुटाचा मोठा खड्डा खोदला आहे. या खड्ड्यालगत प्रशासनाकडून किंवा ठेकेदाराकडून योग्य प्रकारची सुरक्षाव्यवस्था किंवा सावधानतेचा सूचना फलक लावलेला नसल्याने धोकादायक खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे या खड्ड्यात पडून वंडेशकर यांचा मृत्यू झाला आहे, अशी लोकभावना आहे. या घटनेमुळे वंडेशकर कुटुंबामध्ये व नागरिकांमध्ये प्रशासनाच्या व ठेकेदाराच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त होत असून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. धोकादायक ठिकाणी सुरक्षेची उपाययोजना करणे क्रमप्राप्त असताना प्रशासन व ठेकेदार सातत्याने दुर्लक्ष करीत आहेत. या घटनेची तथा येथील कामाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करून संबंधित ठेकेदाराविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे. -- चौकट तुटपुंजी आडकाठी शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा सातत्याने पंचनामा करणाऱ्या माजी महापौर दशरथ पाटील यांनीदेखील ठिकाणी भेट देत या घटनेचा निषेध केला. एवढ्या मोठ्या कामांमध्ये दाखवलेली बेफिकीरी अक्षम्य असून संबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. प्रत्यक्षदर्शी आणि दिवंगत वंडेशकर यांना बाहेर काढणाऱ्या गणेश उफाळे यांच्याकडून त्यांनी माहिती घेतली. या रस्त्यावर एका बाजूने कोणतेही आडकाठी नव्हती तर दुसऱ्या बाजूने अगदी तुटपुंजी आडकाठी करण्यात आली होती, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

Chandrashekhar Bawankule : राज्यातील फासेपारधी व पारधी समाजाच्या अतिक्रमित जमिनींचे सातबारे करण्यासाठी कार्यवाही होणार

IND A vs AUS A 2nd ODI: भारताची पुन्हा हार, ऑस्ट्रेलियाकडून शिकार! पण 'एका'ने ठोकलाय न्यूझीलंड वन डे मालिकेसाठी दावा; कोण आहे तो?

Maharashtra Live News : सीईसीविरोधातील आंदोलनांप्रकरणी सात दिवसांत २७ एफआयआर दाखल

नवरा असावा तर फडणवीसांसारखा! पती अन् मुलीसमोर अमृता फडणवीसांनी सादर केलं गाणं, असं केलं बायकोचं कौतुक

Kaygaon News : कायगाव परिसरात ऊसतोडणी हंगामाची चाहूल; ऊसतोड मजूर दाखल, मात्र दुष्काळाने उसाची वाढ खुंटली, उत्पादन घटणार

SCROLL FOR NEXT