नाशिक

कर्णबधिर विद्यार्थ्यांचे चित्रकला,

CD
NSK26H31948 जळगाव : विद्यापीठात आयोजित चित्रकला स्‍पर्धेतील यशस्‍वी विद्यार्थ्यांसमवेत हेमंत मुंदडा, शिक्षिका निशात शेख आदी. ––– कर्णबधीर विद्यार्थ्यांचे चित्रकला, सांकेतिक वक्तृत्व स्पर्धेत यश सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १२ : आवाज ऐकू येत नसला, शब्दांतून भावना व्यक्त करता येत नसल्या, तरी मनातील विचारांना आणि स्वप्नांना कोणतीही मर्यादा नसते, हे अपंग सेवा मंडळ संचलित मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या कामगिरीतून सिद्ध केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात महात्मा गांधी जयंती सप्ताहानिमित्त आयोजित चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी यश संपादन करून कलागुणांचा प्रेरणादायी परिचय करून दिला. महात्मा गांधी यांच्या विचारांना चित्रांच्या रंगांतून आणि सांकेतिक भाषेच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडत या विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या कामगिरीमुळे केवळ शाळेचाच नव्हे, तर संपूर्ण जळगावकरांचाही अभिमान उंचावला आहे. चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी यांची सुंदर आणि आशयपूर्ण चित्रे रेखाटली. आपल्या कल्पनाशक्तीचा, कलागुणांचा आणि मेहनतीचा सुंदर आविष्कार त्यांनी कागदावर साकारला. स्पर्धेत प्रथम– हिरफा खान, द्वितीय– दिव्या पाटील, तर तृतीय– मोहिनी राजपूत यांनी पटकावला. विद्यार्थ्यांना चित्रकला शिक्षिका निशात शेख यांचे मार्गदर्शन लाभले. –––––––

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडी आक्रमक, राहुल गांधींसह ११ नेत्यांनी दाखल केली याचिका, सुनावणी कधी?

Laptop Mobile Cleaning Tips: मोबाईल बाथरूमपासून बेडरूमपर्यंत कुठेही नेता? मग जंतूंचा संपर्क कमी करण्यासाठी स्वच्छतेच्या 'या' टिप्स वापराच

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे अजूनही सर्वोच्च न्यायालयात, इंडिया आघाडीचे नेतेही उपस्थित

रेल्वे प्रवासात प्रवाशांची घुसमट, अपुऱ्या सुविधांमुळे दररोज गर्दीशी सामना; अतिरिक्त लोकलची मागणी

मायकल जॅक्सनला टिळा लावून स्वागत करणारी एकमेव अभिनेत्री; कसा होता तो अनुभव? सोनाली बेंद्रे म्हणाली- मी कधीच.

SCROLL FOR NEXT