crime esakal
नाशिक

Nashik Crime News : गायक सुरेश वाडकर यांच्या स्वीय सहाय्यकाकडे खंडणीची मागणी; गुन्हा दाखल

प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांना पुन्हा एकदा नाशिकमध्ये वाईट अनुभव आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांना पुन्हा एकदा नाशिकमध्ये वाईट अनुभव आला आहे. वाडकर यांना नाशिकमध्ये संगीत महाविद्यालय सुरू करायचे असल्याने त्यासाठी जागा पाहण्यासाठी त्यांचे स्वीय सहाय्यक उपनगर परिसरात आले असता, दोघा संशयितांनी त्यांच्याकडे २० कोटींची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. (Demand for extortion from singer Suresh Wadkar personal assistant nashik crime news)

याप्रकरणी उपनगर पोलिसांत दोघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश वाडकर यांचे स्वीय सहाय्यक मुनीराज रामकुमार मिणा (रा. वसंतनगरी, वसई, जि. पालघर) यांच्या फिर्यादीनुसार, वाडकर यांनी नाशिक रोड परिसरालगत संगीत महाविद्यालयासाठी भूखंड खरेदी केल्याचे समोर येत आहे.

या जागेची पाहणीसाठी वाडकर यांचे स्वीय सहाय्यक मुनीराज मिणा मंगळवारी (ता. ६) सकाळी गेले. त्या वेळी दोघा संशयितांनी मिणा यांना अडवत जागेत जाण्यापासून रोखले. संशयितांनी मिणा यांना या जागेचे प्रकरण आमच्याकडे आल्याचे सांगून तडजोड होईपर्यंत या ठिकाणी प्रवेश करू नये, असे धमकावले.

तसेच दरगोडे बंधूंना १५ कोटी, आम्हाला पाच कोटी रुपये द्यावेत, अन्यथा जिवे मारण्यात येईल, अशी धमकीही दिली. मिणा यांनी उपनगर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात खंडणीची फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी दोघांचा शोध घेतला जात असल्याचे उपनगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: जरांगेंचं उपोषण सुरु असताना नाशिकमध्ये मराठा समन्वयकांची पत्रकार परिषद; SEBC आरक्षणावर ठाम!

करोडपती सासऱ्याने असं काय केलं की ३० वर्षीय सुनेनं थेट रचला कट, ६ लाखांची सुपारी देत संपवलं; धक्कादायक माहिती उघड

Nagara Road Accident : कामाच्या शोधात निघालेल्या मजुरांवर काळाचा घाला! गोंदिया-बालाघाट मार्गावर ट्रक-पीकअपच्या धडकेत 6 जण ठार, 3 वर्षीय बालकाचाही समावेश; 7 गंभीर

Marathi News Live Updates : काल केसनंद, आज खराडी... ऐश्वर्या जाधव यांच्या लावणी कार्यक्रमाला पुन्हा परवानगी नाकारली!

२८ चेंडूंत १३६ धावा! Mumbai Indians च्या फलंदाजाची हवा; १७३ धावांच्या वादळी खेळीने वेधले जगाचे लक्ष, IPL 2027 गाजवण्यासाठी सज्ज

SCROLL FOR NEXT